*हवेत फवारणी करणार असल्याचा मेसेज खोटा- मनपा आयुक्तांच्या नावे बनावट संदेश, सिटी कोतवालीत तक्रार दाखल* 

311
जाहिरात

विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन

 

अमरावती : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी रात्री हवेत औषधाची फवारणी करण्यात येणार असल्याचा बनावट संदेश सोशल मीडियाद्वारे प्रसारित करण्यात येत आहे हा मेसेज संपूर्णत: खोटा असून त्यावर विश्वास ठेवू नये. याबाबत पोलिसांकडे ही तक्रार दाखल करण्यात आली आहे असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
_मनपा आयुक्तांचा संदेश, नमस्कार ! मी तुम्हाला विनंती करतो की, आज रात्री दहा वाजल्यानंतर सकाळी पाचपर्यंत तुम्ही घराबाहेर पडू नये. कोविड किल1 च्या मृत्यूसाठी हवेत औषधाची फवारणी होईल. आपल्या सर्व मित्रांना नातेवाईकांना आणि आपल्या कुटुंबियांना ही माहिती सामायिक करा. धन्यवाद !_ अशा प्रकारचा मेसेज व्हाट्सअप वर व्हायरल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर फिरणारा हा संदेश महापालिका आयुक्तांकडून टाकण्यात आलेला नाही.
असे संदेश टाकून काही समाजकंटक जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा व भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांनी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।