आकोटात जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
1136
Google search engine
Google search engine

आरोग्य विभागाची शहरात औषध फवारणी

प्रशासन अलर्ट मोडवर ;रस्त्यांवर शुकशुकाट

अकोटःसंतोष विणके

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या जनता कर्फ्यूला अकोट शहर व तालुक्यातून जोरदार प्रतिसाद मिळाला. जनता कर्फ्यू दरम्यान रस्त्यांवर सर्वत्र संचारबंदी दिसत होती. तर नागरिक घराघरात थांबून होते.शहरातील वाहतूक पूर्णपणे बंद होती.

कर्फ्यु दरम्यान अकोट नगरपालिकेच्या आरोग्य विभाग द्वारा बस स्थानक प्रमुख मार्ग व शहरात इतरत्र मोठ्या प्रमाणावर औषधी फवारणी करण्यात येऊन शहराचे सॕनिटायजेशन करण्यात आले.

कर्फ्यू दरम्यान आरोग्य, महसूल पोलीस व पालिका प्रशासनाने चोख व्यवस्था ठेवली होती.नागरिकांनी अत्यावश्यक गरजेसाठीच घराबाहेर पडावे अशा सुचना असल्याने शहरात पूर्णपणे सन्नाटा पसरला होता.

संध्याकाळी पाच वाजता कर्फ्युची वेळ संपताच नागरिकांनी आपत्तीशी लढा देणाऱ्या व आपातकालीन परिस्थितीतही सेवा देणाऱ्या पोलीस,पत्रकार डॉक्टर, नर्स,अग्निशमन, पाणीपुरवठा व सफाई कामगारांना थाळी ,टाळ्या वाजवुन शंखनाद करून त्यांचे आभार व्यक्त केलेत.

संध्याकाळी प्रशासनाने परत नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करत रस्त्यावर न येण्याच्या सूचना केल्यात कर्फ्यु दरम्यान कुठेही अप्रिय घटना न घडता कर्फ्यु शांततेत पार पडला.