आकोट शहर लॉक डाऊन

1019
जाहिरात

संचारबंदीच्या वातावरणाने शहरात सन्नाटा

आकोटःसंतोष विणके

सुमारे १०० पेक्षा जास्त खेड्यांसह आजुबाजुच्या तालुका व शहरांची बाजारपेठ असणारे आकोट शहर मुख्यामंत्र्यांच्या घोषणेनंतर संध्याकाळपासुन संचारबंदीच्या वातावरणाने लॉक डाऊन झाले.कालच्या जनता कर्फ्यू च्या नंतर शहरात लॉक डाऊन घोषित करण्यात आले होते मात्र संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी संचार बंदीची घोषणा करताच शहर बंद होण्यास सुरवात झाली

. यादरम्यान नागरिकांनी भाजीपाला जीवनावश्यक वस्तूचा साठा करून ठेवण्यास प्राधान्य दिले तर शहरात अनेक ठिकाणी अत्यावश्यक सेवा म्हणून दवाखाने व मेडिकल सुरू होते तर पोलीस व पालिका प्रशासनाच्या वतीने नागरिकांना घरात राहण्याच्या सूचना देण्यात येत होत्या. सकाळपासूनच संपूर्ण परिस्थितीवर पोलीस महसूल व पालिका प्रशासनाचे लक्ष होते. प्रशासनाच्यावतीने जमावबंदी टाळण्यासाठी सतत गस्ती पथक शहरात विविध मार्गांवर फिरत होते

. बंद काळात नागरिकांनी पेट्रोल पंप वर आपल्या गाड्यांमध्ये इंधन भरून घेण्यास प्राधान्य दिले. कोरोना व्हायरसमुळे अकोट शहराने पहिल्यांदाच आपत्तीकाळातील संचारबंदी सारख्या परिस्थितीस सामोरे जावे लागले आहे. अकोट शहरात याआधी अनेकदा तणावाच्या घटनांमुळे प्रशासनाला कर्फ्यु लावावा लागला होता.मात्र यावेळी कोरोना सारख्या आपत्तीने संचारबंदीसारखी परीस्थीती निर्माण झाली आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।