मध्यप्रदेश पासून चांदुर बाजार तालुक्याला सर्वाधिक करोना चा धोका नागरिक लपवत आहे माहिती तर दाभोना येथील 8 संशयित निगेटिव्ह

14417
जाहिरात

 

चांदुर बाजार:-

संपूर्ण देशात नव्हे तर जगात करोना व्हायरस चे थैइमान घातले असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जनता कर्फ्यु ला नागरिकांनि चांगला प्रतिसाद चांदुर बाजार तालुक्यात दर्शविला मात्र चांदुर बाजार तालुक्याला सर्वाधिक धोका हा मध्यप्रदेश पासून असल्याचे दिसत आहे.तर त्या ठिकाणचे नागरिक याबाबत माहिती लपवत आहे.

चांदुर बाजार तालुका हा मध्यप्रदेश च्या काठावर असून या मध्येप्रदेश मधील अनेक गावाचा थेट संपर्क हा तालुक्याशी येतो मात्र या ठिकाणी आदीवासी बांधव हे अधिक जास्त असल्याने कामानिमित्त बाहेर गावी गेले असल्याने ते या रोगाची माहिती लपवत आहे.मिळालेल्या माहिती महाराष्ट्र वरून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या दाभोना या गावात 12 युवक हे दिल्ली वरून आले असल्याची माहिती मिळाली त्यामध्ये 3 जणांना याची लागण असल्याची चर्चा गावात सुरू होती आता मात्र ते निगेटिव्ह निघाले आहेत

 

तर त्यांच्या सोबत 4 जण हे चांदुर बाजार चे असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले. त्यापैकी दोघांना काल अमरावती पाठविण्यात आले असल्याची माहिती मिळाली.

मध्य प्रदेशातील अनेक लोक अनेक राज्यात कामाला जातात मात्र ते आता परत आपल्या गावी येत असून त्यांच्या तपासणी बाबत माहिती द्यायला देखील ते तयार नाही त्यांच्या संपर्क थेट चांदुर बाजार तालुक्याशी येत असून नागरिकांनी सतर्क राहणं आवश्यक आहे.

चेक पोस्ट नाही…………………………….

बहिरम येथील चेक पोस्ट सोडले असता मध्यप्रदेश मध्ये जाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या एकही रोडवर चेक पोस्ट नाही त्यामुळे चेक पोस्ट तयार झाले तर बाहेर आल्याची संख्या माहिती होऊन कोणी जर करोना विषाणू लागण असेल तर त्याची माहिती प्रशासन ला होईल.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।