खड्डे चुकवण्याच्या नादात युवकाला अज्ञात वाहनाची धडक कधी होणार रस्ताची दुरुस्ती अखेर प्रशासन च्या नाहरकतेमुळे गेला नाहक बळी

0
1209

खड्डे चुकवण्याच्या नादात युवकाला अज्ञात वाहनाची धडक ,कधी होणार रस्ताची दुरुस्ती
अखेर प्रशासन च्या नाहरकतेमुळे गेला नाहक बळी

चांदुर बाजार:-

माधान ते चांदूरबाजार रोडवर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते.या रोडवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्याने अनेक वेळा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही पंधरा दिवस आधी ब्राह्मणवाडा थडी येथील युवक आशिष औतकर याच खड्ड्यात पडून त्यांच्या गुडघ्याला मार लागला होता.तर काही महिन्यांपूर्वी माधान येथील उपसरपंच दिनेश देशमुख सुद्धा या खड्यामुळे थोडक्यात बचावले होते. तर दिनांक 21 मार्चला दुपारी बाराच्या दरम्यान माधान पासून एक किलोमीटर अंतरावर असलेला खड्डे चुकवण्याच्या नादात शिरसगाव कसबा येथील युवक निखिल माधवराव गुल्हाने येथील वय अंदाजे वीस वर्ष हा रोडवरील खड्डा चुकवण्याच्या नादात याला अज्ञात वाहनाने दिलेल्या जबर धडक मध्ये त्यांचा याचा जागीच मृत्यू झाला आहे.तर या मध्ये त्याचे मोटरसायकल क्रमांक MH 27 Q 4277 हिचे सुद्धा नुकसान झाले आहे. तर त्याच्यासोबत असलेल्या त्याची चुलत बहीण सोनू हे सुद्धा जखमी जखमी सुद्धा झाली आहे.असे प्रथम दर्शनी यांच्या सांगण्यावरून माहीत झाले.

या रोडवर मागील एक वर्षापासून मोठ्या प्रमाणावर मध्य प्रदेशमधून वाहना मधून वाळूची वाहतूक होते आहे. तसेच मुरूम ची सुद्धा वाहतूक होते आहे.त्यामुळे च रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले आहे. या ठिकाणी असलेल्या मोठमोठे खड्डे आहे. याकडे संबंधित विभागाने अद्यापही दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे .या पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक बरोबर शेतकरीवर्ग सुद्धा वाहन चालवताना असुरक्षित असल्याचे दिसत आहे.

मात्र याकडे विभागाने लक्ष न दिसल्याने आज शिरजगाव कसबा येथील युवक याला आपला जीव गमवावा लागला आहे .चांदूरबाजार वरून शिरसगाव येथे जात असताना माधान च्या अलीकडे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या खड्डे चुकवण्याच्या नादात त्याच्या गाडीला अज्ञात वाहनांची धडक लागली आणि तो जमिनीवर कोसळला यातल्या डोक्याला मार लागून जागीच मृत्यू झाला तर त्याच्या चुलत बहिणींना देखील मार लागला आहे.

घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत नागरिकांच्या मदतीने उपचार साठी रुग्णालयात दाखल करणयात आले तर मृतक याला ग्रामीण रुग्णालयात मध्ये नेण्यात आले.पुढील तपास चांदुर बाजार पोलीस करीत आहे.पोलीस सानी या गुन्ह्यात अज्ञात वाहन वर गुन्हा दाखल केला.आहे आणि वाहनाचा शोध पोलीस घेत आहे।

बॉक्समध्ये
तालुक्यात अवैध वाळू तस्करीवर निर्बंध लावले असताना 3 वर्षापूर्वी नवीन असलेल्या माधान ते चांदुर बाजार रस्त्यावर शेकडो ट्रक मधून मध्यप्रदेश मधून वाळू तस्करी होते आहे.त्याच प्रमाणे मुरूम ची मोठं मोठे त्रिपर देखील याच रोडने धावतात याकडे संबंधित विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची चर्चा या अपघात मुळे होत आहे.माध्यमांनी ने या खड्या बाबत अनेक वेळा वृत्त प्रकाशित करून प्रशासन यांच्या नाहरकत मुळे हा बळी केली असल्याची चर्चा आहे.तसेच या रोड संदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री याना सुद्धा देण्यात आले होते.तरी देखील या रोडची दुरुस्ती झाली नाही.