होम क्वारंटाइन असलेल्या दोघांची तहसीलदार,मुख्याधिकारी आणी वैद्यकीय अधिका-यांकडुन पाहणी

1872
जाहिरात

*होम क्वारंटाइन असलेल्या दोघांची
तहसीलदार,मुख्याधिकारी आणी वैद्यकीय अधिका-यांकडुन पाहणी*

*बीड:परळी वैजनाथ…(प्रतिनिधी)*
*नितीन ढाकणे*

देशात आणी महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची दिवसेंदिवस वाढत चाललेली गंभीर परिस्थिती लक्षात घेता परळीत दोन विदेशातुन आलेल्या नागरिकांची अरोग्य विभागाच्या वतिने तपासणी करुन होम क्वारंटाइनचा सल्ला दिलेला होता.त्यांची आजच्या परिस्थितीत त्याचे अरोग्य कसेआहे हे पाहण्यासाठी तहसीलदार,मुख्याधिकारी आणी वैद्यकीय अधिका-यांकडुन पाहणी करण्यात आली असुन त्यांची प्रकृती चांगली असल्याची डॉ रामेश्वर लटपटे यांनी सांगितले.
या स्थळ पाहणी पथकात परळीचे तहसीलदार डॉ बिपीन पाटिल,मुख्याधिकारी डॉ अरविंद मुंडे डॉ कुरमे,नायब तहसीलदार बाबुराव रुपनर तलाठी राजुरे व पोलीस काॕन्सटेबल समाधान भाजीभाकरे अदी प्रशासकीय अधिकारी होते.
दरम्यान परळी उपजिल्हा रुग्णालयात स्थापीत केलेले आयसोलिशन विभागाला भेट देऊन आढावा घेतला

 

राज्यात जमावबंदी 144 कलम लागु असल्याने पाच किंवा पाच पेक्षा अधिक नागरिकांनी एकञ येणे टाळावे.शहरात अत्यअवशक सेवा सुरळीत पणे चालु आहेत तेव्हा कोणीही अनावश्यक गर्दी न करता घरीच बसणे योग राहील.हा कोरोना आजार संसर्ग आहे तेव्हा किमान तीन ते पाच फुटाचे अ़ंतर ठेवावे आणी वेळोवेळी हात स्वच्छ करावे व प्रशासनाकडुन येणाऱ्या सुचनांचे पालन करावे.

तहसीलदार डॉ बिपीन पाटिल,परळी वैजनाथ

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।