घुईखेड येथे बेंडोजी बाबा संस्थानतर्फे मास्कचे वाटप – श्री स्वामी समर्थ बचत गटाने तयार केले मास्क

0
515
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे –

कोरणा विषाणु प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील श्री संत बेंडोजी बाबा संस्थानतर्फे मास्कचे मोफत वितरण करण्यात आले. सदर मास्क हे घुईखेड येथील श्री स्वामी समर्थ बचत गटाने तयार केले.

श्री संत बेंडोजी बाबा संस्थानतर्फे मंगळवारी घुईखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना तसेच येणाऱ्या रूग्णांना मास्कचे वितरण करण्यात आले. यानंतर आता मास्क ड्युटीवर असलेल्या सर्व विभागील कर्मचाऱ्यांना देण्यात येणार असुन गावकऱ्यांना सुध्दा वाटप करणार असल्याचे संस्थानचे विश्वस्त प्रविण घुईखेडकर यांनी सांगितले. सदर मास्क हे घुईखेड येथील श्री स्वामी समर्थ बचत गटाच्या संगिता पुनसे, सुनिता मिर्चापुरे, शिला काकडे, मालु मिर्चापुरे, शकीला सुलेमान, सिमा मिर्चापुरे यांनी तयार केले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात मास्करचे वितरण करतेवेळी माजी जि. प. सदस्य तथा विश्वस्त प्रविण घुईखेडकर, सरपंच विनय गोटफोडे, डॉ. मोनाली ढोरे, गोपाल मांडवेकर, डॉ. अशोक तुमरेटी, तोरळकर, राठोड, सातपुते आदींची उपस्थिती होती.