अतिशय गरजू व्यक्तीकरिता भोजन साहित्याची व्‍यवस्‍था हा भाजपाचा संकल्‍प :- माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे

164
जाहिरात

चैत्र शुध्‍द प्रतिपदा अर्थात गुढी पाडव्‍याच्‍या शुभमूहूर्तावर वरुड व मोर्शी या ठिकाणी कोरोना विषाणुच्‍या पार्श्‍वभूमीवर त्याला लढा देण्याकरिता व त्यांचा संसर्ग टाळण्यासाठी मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी संपूर्ण भारत देश लॉकडाउन करण्याची घोषणा केली व त्यातच अतिशय गरजूंसाठी भोजनाचे साहित्याची (शिधाआटा) व्‍यवस्‍था करण्‍यात येईल, असा संकल्‍प भारतीय जनता पार्टीने केला असून गरजूंसाठी या दोन्‍ही शहरात पुढील २१ दिवस पर्यंत म्हणजे १४ एप्रिल पर्यंत भोजनाच्या साहित्याची व्‍यवस्‍था भारतीय जनता पार्टीतर्फे करण्‍यात येत असल्याचे माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी जाहीर केले आहे.

सर्व नागरिकांना गुढी पाडव्‍याच्‍या शुभेच्‍छा देत कोरोना विरोधातील या लढयात आपण निश्‍चीतपणे जिंकू असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला आहे. त्‍याचप्रमाणे जिल्‍हयामध्‍ये भाजपाच्‍या प्रत्‍येक लोकप्रतिनिधींनी आपल्‍या भागात गरजूंना मदत करण्‍याच्‍या दृष्‍टीने योग्‍य नियोजन करावे व प्रत्‍येक गरजूवंताला मदतीचा हात द्यावा, असे आवाहन सुध्‍दा माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले आहे.

भोजन सामुग्री संदर्भात जबाबदारी

भोजन सामुग्री संदर्भात वरुड शहरात भाजप तालुकाध्यक्ष राजकुमार राऊत मो. ९६६५२१६४८१, भाजपा वरुड शहराध्यक्ष डॉ. निलेश बेलसरे मो. ८८०५८३३६३२, शेघाट भाजपा शहराध्यक्ष निलेश फुटाणे मो.९४२०७१४८६६, युवराज आंडे मो. ९४२२१५७७५६, प्रीतम अब्रूक मो. ९८३४०८७१३८, ऋषिकेश दुर्गे मो. ८६९८३२३१९८, रविराज पुरी मो. ७७९८०४७२२८, मारोती पवार मो. ९८६०४७३२७१, हितेश तडस मो. ९९७०९६३२४३, अपूर्व आंडे मो. ७६२०८६७८३४ यांच्‍याशी संपर्क साधावा, व मोर्शी करिता भाजपा तालुकाध्यक्ष देव बुरंगे मो. ९८६०६१९७५४, भाजपा शहराध्यक्ष रवी मेटकर मो. ९८२२८३१८२३, अजय आगरकर मो. ९८९०१३६१७४, न.प. उपाध्यक्ष आप्पासाहेब गेडाम मो. ७७९८५८२७७६, नगरसेवक हर्षल चौधरी मो. ९९७००७७९९५ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्‍यात आले आहे. भारतीय जनता पार्टीतर्फे १४ एप्रिल पर्यंत ही व्यवस्था करण्‍यात आली आहे.

कोरोना विरोधातील या लढयात भारतीय जनता पार्टीचा प्रत्‍येक कार्यकर्ता जनतेच्‍या सेवेसाठी तत्‍पर आहे. वरील व्‍यवस्‍थांचा अतिशय गरजू व्यक्तीने लाभ घ्यावा व पदाधिका-यांशी संपर्क साधण्‍याचे आवाहन माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।