कोरोना चा थेट परिणाम हा शेतकरी वर्गावर संत्रा,टरबूज,आणि फोल्ट्री उद्योगाला लाखोंचा फटका,शेतकरी आर्थिक संकटात

जाहिरात

कोरोना चा थेट परिणाम हा शेतकरी वर्गावर
संत्रा,टरबूज,आणि फोल्ट्री उद्योगाला लाखोंचा फटका,शेतकरी आर्थिक संकटात

K
अमरावती:-

सध्या संपूर्ण जगात कोरोना व्हायरस बाधित असलेल्या ची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहन नंतर 22 मार्च ला संपूर्ण देशात जनता कर्फ्यु ला जनतेने चागला प्रतिसाद दिला मात्र काही लोकांमुळे आणि 23 मार्च लोकांनी सकाळ पासूनच रोडवर गर्दी केल्याने राज्यच्या मुख्यमंत्री यांनी 23 मार्च ला सायंकाळी संपूर्ण राज्यात संचार बंदी केली.यांचा फटका हा शेतकरी यांना बसला आहे.

माधान येथील शेतकरी सतीश मोहोड यांनी आपल्या अडीच एकर शेतात टरबूज लागवड केली होती मात्र आता टरबूज ला मार्केट उपलब्ध नसल्याने त्यांना त्याची साठवणूक करावी लागत आहे आणि व्यापारी सुद्दा टरबूज घ्यायला तयार नाही आहे.13 रुपये प्रतिकिलो असलेलले टरबूज 4 रुपये प्रतिकिलो ने सुद्दा घ्यायला तयार नाही.तर संचारबंदी मुळे वाहतूक बंदी असल्याने सतीश मोहोड यांच्या बरोबर राहुल म्हला, पिसे या शेतकरी याना सुद्धा याचा फटका बसला आहे.

तालुक्यातील काजळी येथील फोल्ट्री तयार करून व्यवसाय करणारे युवा व्यवसाहिक आदित्य देशमुख यांना सुद्दा या संचारबंदी चा परिणाम त्याच्या उद्योग वर पाहायला मिळाला जवळपास आठवड्याभर जमा झालेल्या अंडे त्यांच्या कडे पडून असल्याने जास्त काळ त्याची साठवणूक देखील करू शकत नसल्यामुळे याचा सुद्धा फटका त्यांना बसला आहे.सोशल मीडियावर वर व्हायरल संदेश मुळे या फोल्ट्री फ्रॉम धारकांना चांगलाच फटका बसला आहे.

प्रतिक्रिया:-
8 रुपये प्रतिकिलो ने टरबूज ची विक्री केली होती मात्र संचारबंदी मुळे वाहनाची वाहतूक बंद असल्याने त्याची साठवणूक करीत आहे.मात्र आठ दिवस अधिक काळ याची साठवणूक करू शकत नाही.तरी शासन यांनी याबत काहीतरी उपाययोजना करावी.
1)सतीश मोहोड शेतकरी
———————————————————————————
सुरुवातीला सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या अफवा मुळे अंडे आणि कोंबडी भाव देखील पडले होते.आधीच आणिजवळ पास मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आणि आता संचार बंदी लागली असल्याने अंडे कसे विकायला न्यायचे हा प्रश्न आहे.तरी यावर काही तर मार्ग काढण्यासाठी पाऊले उचलणे आवश्यक आहे.
2)आदित्य देशमुख युवा शेतकरी

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।