*नागपूरची ती ऑडिओ क्लिप खोटी ●● चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या फेक पोस्ट पासून सावधान रहा– प्रशासनाचे आवाहन*

0
3067

 

चुकीचा संदेश व्हायरल करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई

कोरोना संदर्भात व्हाट्स अप वर अत्यंत बेजबाबदार तसेच दिशाभूल करणाऱ्या आडिओ व व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहेत, अशा चुकीची माहिती अथवा चुकीचा संदेश पाठविणे , पोस्टकरणे अफवा पसरविणे हा गंभीर गुन्हा आहे, याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे,

नागपूर येथे केवळ चार नागरिक करोना बाधित असून त्याचेवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत, त्यानंतर केलेल्या चाचण्यांमध्ये एकही पॉझिटिव्ह आढळला नसून सर्व निगेटिव्ह आहेत, नागपूर विभागासह, मध्यप्रदेश, छत्तीसगड आदी ठिकाणाहून कोरोना चाचणी करण्यासाठी येत आहेत, राज्यातील सर्वात अद्ययावत अशी प्रयोगशाळा आहे,मुंबई, पुणे व नागपूर येथे ही सुविधा उपलब्ध आहे, त्यामुळे समाज माध्यमात अशा प्रकारच्या अफवा पसरवून वातावरण दूषित करणार्याच्या पोलीस सायबर सेल मार्फत शोध घेऊन गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे नागपूर विभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

*अमरावती जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन*

शासनाकडून वेळोवेळी अधिकृत माहिती प्रसारित करण्यात येत आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. सजग राहून खबरदारी घ्यावी. कुठलीही शंका असल्यास हेल्पलाईनला फोन करून माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे. *हेल्पलाईनसाठी जिल्हाधिकारी कार्यालय टोल फ्री क्रमांक  1800 233 6396 व संवाद कक्षाचा (0721) 2661355 असा आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाचा दूरध्वनी क्रमांक  (0721) 2663337, आपत्ती नियंत्रण कक्षाचा (0721) 2662025, अमरावती महापालिकेचा  8408816166, तर जिल्हा परिषदेचा (0721) 2662591, जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाचा (0721) 2665041, तर पोलीस आयुक्तालय नियंत्रण कक्षाचा (0721) 2551000 असा आहे*.

 

राज्य नियंत्रण कक्षाचा (020) 26127394, एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प कक्ष (020) 27290066 आणि टोल फ्री क्रमांक 104 हा आहे.