प्रहारच्या तुषार पुंडकर हत्याकांडातील आरोपींना अटक

13501

आरोपी आकोटातीलच निघाल्याने प्रचंड खळबळ

अकोलाःप्रतिनिधी

प्रहार’चे माजीअकोला जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांची दि.21 फेब्रुवारीला पोलीस वसाहतीत अज्ञात हल्लेखोरांनी देशी कट्ट्यातून गोळ्या झाडून हत्या केली होती या हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला होता.अकोला जिल्हा पोलिसांनी हत्याकांडात सहभाग निष्पन्न झालेल्या तिन आरोपींना दि.२६ रोजी अटक करत या हत्याकांडाचा यशस्वी उलगडा केला.

या हत्याकांडाच्या तपासासाठी पोलिसांची ६ तपास पथकं कसून तपास करत होती.अखेर अत्यंत गुंतागुंतीच्या व संवेदनशील ठरलेल्या या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा करण्यात काल पोलिसांना यश आले.या घटनेने संपूर्ण आकोट शहर व तालुका हादरला होता.
अटकेतील आरोपी हे अकोटमधीलच निघाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

पोलीस सूत्रानुसार आरोपी पवन सेंदानी(38) अल्पेश दुधे(24) स्वप्निल नाठे(22) सर्व राहणार अकोट यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.याबाबत स्था.गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षनि व जनसंपर्क अधिकारी शैलेश सपकाळ यांनी माहीती दिली. अकोला पोलिसांनी या गुन्ह्याचा यशस्वी तपास केल्याने अमरावती विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी अकोला जिल्हा पोलिस दलाचे अभिनंदन करून तपास पथकातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना५० हजाराचे रिवॉर्ड घोषित केले आहे.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सहा तपास पथकातील पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ पोलीस निरीक्षक संतोष महल्ले पोलीस निरीक्षक मिलिंद बहाकार तसेच पोलिस निरीक्षक कैलास नागरे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत ममताबादे बुलढाणा सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश चतरकर सहा.पोलीस निरीक्षक श्रीनिवास राठोड नांदेड सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शैलेश ठाकरे सायबर सेल पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार पोलीस उपनिरीक्षक तुषार नेवारे शैलेश मस्के पोलीस उपनिरीक्षक रणजितसिंह ठाकूर तसेच स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेल, पोलीस स्टेशन अकोट शहर, पोलीस स्टेशन रामदासपेठ, पोलिस स्टेशन खदान, विशेष पथक अकोला व या तपास पथकातील 70 कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतलेत.