आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातुन उपलब्ध सॅनिटयझर व मास्कचे सिंदेवाही येथील शासकीय धान्य गोदामातील मजुरांना वाटप

373

सिंदेवाही – देशभरात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातुन शुक्रवार दि. २७ मार्च ला सिंदेवाही शहरातील शासकीय धान्य गोदामात काम करणार्‍या मजुरांना सॅनिटयझर व मास्कचे वाटप जि. प. समाजकल्याण सभापती नागराजजी गेडाम यांच्या हस्ते पार पडला आणि कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर प्रतिबंध म्हणून सर्वांनी आपली व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी. असे आव्हान त्यांनी याप्रसंगी केले.
विशेष म्हणजे हा विधानसभा क्षेत्र राज्याचे बहुजन कल्याण, मदत पुनर्वसन व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचाआहे, त्यांच्या क्षेत्रात माजी पालकमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्फत सॅनिटायजर व मास्क वाटप म्हणजेच कोरोना बद्दल स्थानिक कामगारांची चिंता पालकमंत्र्यांना मुळीच नाही का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

जाहिरात