अकोला शहरात विनाकारण फीरणाऱ्या आॕटोंना लावले वाहतुक कार्यालयात

0
860
Google search engine
Google search engine

 

अत्यावश्यक कारणांशिवाय रस्त्यावर फीरणारे आॕटोवर होणार कारवाई

शहर वाहतूक निरीक्षक गजानन शेळके ह्यांची तंबी

अकोलाः प्रतिनिधी

अकोला शहरात संचारबंदी असतांनाही ऑटो धावत असल्याने विनाकारण धावणारे आॕटोंना शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक गजानन शेळके यांनी वाहतुक शाखा कार्यालयात लावले असुन बेशिस्त वाहनचालकांनवर विनाकारण रस्त्यावर फीरतांना दिसल्यास कारवाई केल्या जाणार असल्याची तंबी दिली आहे. संचारबंदी चा कालावधी हा मोठा असल्याने संचारबंदीच्या काळात ऑटो रस्त्यावर येऊ न देण्याचे मोठे आवाहन पोलीस प्रशासन समोर आहे, त्या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर ह्यांचे निर्देशा प्रमाणे शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी आपली पूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे.

रस्त्यावर विनाकारण काहीही कारणे सांगून धावणाऱ्या ऑटोना पकडुन वाहतूक कार्यालयात लावण्याचा सपाटा सुरू केला आहे.त्यामुळं ऑटो चालकांनी आपला ऑटो विनापरवाना रस्त्यावर आणू नये, सहकार्य करावे तसेच ज्यांना रुग्णसेवा किंवा इतर अत्यावश्यक कामा साठी ऑटो वापरायचा असेल त्यांनी रीतसर पास घेऊनच ऑटो रस्त्यावर आणावा नाहीतर कडक कार्यवाही करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.