ग्रामीण भागात “हम नहीं सुधारेगे ” चे चित्र तर भाजी मार्केट मध्ये सोशल डीस्टंट बाबत गंभीर नाही

0
926
Google search engine
Google search engine
  1. ग्रामीण भागात “हम नहीं सुधारेगे ” चे चित्र
    तर भाजी मार्केट मध्ये सोशल डीस्टंट बाबत गंभीर नाही

चांदुर बाजार

चीन मधील वुहान या ठिकाण वरून निघालेला कोरोना व्हायरस मुळे संपूर्ण जग संकटाशी लढत आहे.शहरात तसेच ग्रामीण भागात मोठया प्रमाणात उपाययोजना करून देखील नागरिक त्याबाबत गंभीर नसल्याचे दिसत आहे.ग्रामीण भागात शेती कामाला सोशल डीस्टंट ठेवून करायला सांगितले आहे मात्र या कडे कोणाचे लक्ष नसून अजूनही ग्रामीण भाग या बाबत गंभीर नाही.

काही ठिकाणी लोकांना हा मनोरंजन चा विषय वाटत आहे.पोलीस आले की घरात आणि गेले की बाहेर असे चित्र ग्रामीण भागात आहे.तर स्वतः हुन या कोरोना विषाणू बाबत कोणीच गंभीर व्हायला तयार नाही.गावात अनेक ठिकाणी लोक गोळा होऊन गोष्टी करीत आहे.तर ज्यांना होम करिईन्ट सांगितले ते आणि त्यांचा घराचे मस्त बाहेर फिरत आहे.त्यामुळे ग्रामीण भागात कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाकरिक सहकार्य सोडून आपला मनमानी पणा करीत आहे.

भाजी मार्केट मधून कोरोना येऊ शकतो तुमच्या घरात.चांदूर बाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सोमवार सोडून भाजीपाला खरेदी विक्री सुरू असते मात्र या ठिकाणी सोशल डीस्टंट चा फज्जा उडाला आहे.या ठिकाण वरून ग्रामीण तसेच शहरी भागातील लोक भाजीपाला विकत असतात पण इथून देखील कोरोचा प्रसार होऊ शकतो. बाबत लोक अधिकही गंभीर नाही.