बाहेर जिल्ह्यातुन आलेल्यांची माहीती गोळा करण्यासाठी आकोट पालीकेचा विशेष सर्वे

0
869
Google search engine
Google search engine

अकोटः ता.प्रतिनिधी:

जीवघेणा कोरोनाला रोखण्यासाठी अकोट नगरपालिका प्रशासनाद्वारा मुंबई पुणेसह बाहेर जिल्ह्यातुन आलेल्या लोकांच्या माहीती गोळा करण्यासाठी विशेष सर्वेक्षण मोहीम सुरु करण्यात आली आहे.दरम्यान कोरोना प्रतिबंधक उपाययोजने संदर्भात मुख्याधिकारी. डोल्हारकर यांनी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची सभा घेतली. या सभेत कोरोना प्रतिबंधक उपाय योजनेबाबत सविस्तर चर्चा करून योग्य निर्देश सर्व विभाग प्रमुखांना देण्यात आले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालीकेची आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत असुन पालीका प्रशासन इतर शहरातून आणि बाहेर जिल्ह्यातुन आलेल्या नागरिकांची नोंद घेत आहे. पुणे ,मुंबई सह ईतर शहरातुन येणाऱ्या लोकांचा सर्वे करण्यासाठी विशेष पथकाचे गठन करण्यात आले आहे.अकोट नगर परिषदेचे कर्मचारी घरोघरी जाऊन बाहेरगावाहून येणाऱ्यांची माहिती गोळा करीत आहेत.

याबाबत नगरपरिषदेच्या आपातकालीन कक्षास / ग्रामीण रुग्णालयास.अथवा आपत्कालीन कक्षाच्या या 07258- 220083 क्रमांकावर संपर्क करता येईल. आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल.असे आवाहन मुख्याधिकारी डोल्हारकर यांनी नागरीकांना केले आहे.