ग्रामस्तरिय कोरोना जनजागृति समिति ची स्थापना

0
619
Google search engine
Google search engine

सिंदेवाही- चन्द्रपुर जिल्ह्यातील सिंदेवाही तलुक्यातील सर्व सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील व कोतवाल यांना कळविण्यात येते की, आपल्या कार्यक्षेत्रात ग्रामस्तरीय कोरोना जनजागृती समिती स्थापन करण्यात आली आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील बऱ्याच गावांमध्ये बाहेरून आलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या हातावर कोरोंटाईनचे शिक्के मारले आहेत. असे शिक्के काळजी घेण्यासाठी मारण्यात आलेल्या आहेत. अशा शिक्के मारलेल्या व्यक्तींनी काही दिवस घराच्या बाहेर इतरत्र न फिरता घरातच थांबणे अपेक्षित आहे. अशा व्यक्तींची दररोज माहिती घेऊन त्यापैकी कोणाला घसा दुखणे ताप येणे, श्वास घेण्यास अडचण येणे, खोकला येणे अशी लक्षणे दिसून आल्यास तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांना तसेच तहसील कार्यालय आणि गटविकास अधिकारी यांचे कार्यालयात कळविणे आवश्यक आहे. ही बाब गांभीर्यपूर्वक घ्यावी, यात चुकू नये. कोणत्याही परिस्थितीत home quarntine केलेल्या व्यक्ती घराच्या बाहेर फिरणार नाहीत याची काळजी घ्या सांगूनही अशा व्यक्ती ऐकत नसतील तर समितीने त्यांची तक्रार पोलीस स्टेशन कडे करावी जेणेकरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करता येईल….यामध्ये वैकक्तिक संबंध बाजूला ठेऊन गावहित तसेच तालुका हित जोपासूया. सर्वांना आवाहन करतो की पुढील 15 दिवस खूप महत्वाचे आहेत यामध्ये काळजी जर घेतली नाही तर परिस्थिती बिकट होईल…. चला सर्वांनी मिळून या संकटाला सामोरे जाऊन मात करूया …. आतापर्यंत तालुक्यातील वासीयांनी दाखविलेल्या सयमाबद्दल त्यांचे आभार तसेच घरात बसून जनतेने यापुढेही असेच सहकार्य करावे.

*गणेश जगदाळे ,तहसीलदार तथा अध्यक्ष तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंदेवाही*