कडेगांव येथे मैत्र प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

जाहिरात

सांगली/कडेगांव न्युज

सध्या जगभरात व देशात कोरोना व्हायरस या विषाणुने थैमान घातले आहे.लाखो लोकांचे बळी गेले आहेत.कोरोना विषाणचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालल्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे त्यावर मात करण्यासाठी सोमवार दि.३० मार्च २०२० रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत छ्.शिवाजी महाराज चौकातील दत्त मंगल कार्यालय कडेगांव येथे रक्तदान शिबीर आयोजित केले आहे.या रक्तदान शिबिरात नागरीकांनी, युवकांनी, त्याचबरोबर शहरातील गणेश मंडळ,क्रिडा मंडळ,नवरात्र उत्सव मंडळ मीत्र मंडळ,यात्रा मंडळ इत्यादी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन कडेगांव येथिल मैत्र प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.सदरचे रक्तदान शिबीर जमावबंदीचे काटेकोर पालन करून घेणार असल्याचेही मैत्र प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनकडून सांगण्यात आले आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।