प्रत्येक नागरीकांनी घरातुन बाहेर न पडता शुभंकरोती,रामरक्षा,व हनुमान स्तोत्र लुप्त होत आहे त्यास संजिवनी द्यावी व कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव तडीपार करावा!!

सांगली/कडेगांव: न्युज:


आजच्या धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनात नीतीमुल्यांचा व सुसंस्काराचा ऱ्हास होताना दिसत आहे.आताच्या जमान्यात लहान मुले,मुली देवापुढे देवघरात फिरकतच नाहीत.त्यामुळे पुर्वी देवापुढे म्हटली जाणारी शुभंकरोती लहान मुले म्हणताना दिसतच नाहीत.आई, वडीलांचा,आजी आजोबांचा घेतला जाणारा आशिर्वाद हे क्वचितच निदर्शनास येत आहे.एकुणच वडीलधाऱ्यांच्या आज्ञेत राहणारी पिढी नष्ट होऊ लागल्याचे चित्र आहे.खरेतर आत्ता जगभरात व हिंदुस्तानात कोरोनो व्हायरसचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालला आहे हीच वेळ साधुन आई,वडीलानी,आजी आजोबांनी घरातुन बाहेर न पडता ही लुप्त होत चाललेली शुभंकरोती,रामरक्षा व हनुमान स्तोत्र लहान मुलांच्या कडून वधवुन घेतली तर अधिक चांगले संस्कार घडतील अधुनिक हिंदुस्तानच्या निर्माणामध्ये भारतीय संस्कृतीला अतिशय महत्व आहे.जगभरात सर्वश्रेष्ठ आपली भारतीय संस्कृती आहे.ज्या संस्कृतीमुळे अनेक विचारवंत,संतमहंत व महापुरूष घडविले परंतु २१ व्या शतकामध्ये कॉप्युटर युगात व रोजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाचे राहणीमान बदलले परंतु हा बदल प्रणालीच्या दिशेने असला तरी प्रगतीमध्ये संस्कृती हरवत चालली आहे.युवक युवती या होणाऱ्या बदलांमुळे मोठ्या प्रमाणात स्वत:ला झोकुन देत आहेत की या आधुनिक बदलत्या काळात हरवुन बसली आहे.
बदलत्या काळात ही मुले,मुली अभ्यासात गुरफुटुन गेली आहेत.शाळाही व पालकही अभ्यासाचे नको इतके ओझे त्यांच्यावर टाकत आहेत.त्यामुळे मैदानावर खेळणारी मुले आता अपवादानेच दिसत आहेत.त्यामुळे मुलांचा बुध्द्यांक वाढला तरी त्यांचे आयुष्यमान मात्र घटत असल्याचे वास्तव चित्र आहे.पुर्वीसारखी गुरूकुल सारखी शिक्षणपध्दती उरली नाही.
पाटीवरती श्री गणेशा करून आकडेमोड करणारी मुलं आता संगणकावर गणित सोडवु लागली आहेत.अंगात फाटके तुटके कपडे घालुन ठिगळ लावुन शिक्षणाचा धडा घेण्यासाठी जाणारी मुल आता सुटाबुटात मोटारसायकल घेऊन शाळेत जात आहेत यामुळे सगळच कस बदललेल जाणवत आहे.जर प्रत्येक आई वडील,आजी आजोबांनी,भाऊ,बहीण यांनी घरातुन बाहेर न पडता जर सकाळ, दुपार,संध्याकाळ जर देवापुढे बसुन लहान मुलांनाच नव्हे तर सर्वानीच शुभंकरोती,रामरक्षा,हनुमान स्तोत्राचे पठण केल्यास लहान मुलांच्यावर संस्काराचेही काम होईल व घरातच थांबल्यामुळे कोरोनो व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदतही होईल एवढे जरी प्रत्येक नागरीकांनी केले तरी संस्कारही होईल व देश सेवाही घडेल असे दुहेरी हेतु साध्य होतील! पण हे मनात असुन चालणार नाही तर ते आचरणात आणले पाहिजे! तर मग चला उद्याच पासुन आपण घरातुन बाहेर पडायचे नाही ठरले तर मग लहान मुलांच्यावर संस्काराचे धडे गिरवुयात व हिंदुस्थान वाचवुयात!!