*श्रीराम सेवा समिती,अहेरी तर्फे पोलीस विभागाला 100 मास्क व 50 दूपट्यांची भेट..!!*

0
588

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सद्या अहेरी पोलीस विभागाला मोठी जोखीम घेऊन दिवसरात्र काम करावे लागत आहे व ह्या कठीण परिस्थितीत मास्क घालून काम करणे आवश्यक असतांना पोलीस विभाग,अहेरीकडे मास्कचा तुटवडा आहे ह्याची माहिती श्रीराम सेवा समिती अहेरीच्या पदाधिकाऱ्यांना काल समजली होती..!!
समितीच्या पदाधिकाऱ्यांनी लगेच ह्याची दखल घेत आज सकाळी 100 मास्क व उन्हापासून बचाव व्हावे मनुन 50 दुप्पट्टे अहेरी पोलीस स्टेशन गाठून पोलीस निरीक्षक श्री. प्रवीण डांगे साहेब यांच्याकडे स्वाधीन केले व ह्यापुढेही ह्या संकट समयी श्रीराम सेवा समिती,अहेरी तर्फे पोलीस विभागाला शक्यतो पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही ह्यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी डांगे साहेबांना दिली,ह्यावर डांगे साहेबांनी समाधान व्यक्त केले..!