चांदूर रेल्वेत युवकाची आत्महत्या नैराश्येतुन टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा

0
3101
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे :-
स्थानिक डांगरीपुरा परिसरात राहत असलेल्या एका युवकाने आपल्या घरातच साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. गेल्या दोन वर्षांपासून बायको माहेरी गेल्याने आणि त्यातच  हाताला काम नसल्याच्या नैराश्यात त्याने आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात ऐकायला मिळाली.
प्रशांत सदाफळे असे त्या मृत युवकाचे नाव असून त्याला दारूचे व्यसन होते. त्यातच घरी होत असलेल्या वादामुळे त्याची पत्नी 2  वर्षा अगोदार मुलं घेऊन माहेरी गेली असल्याचे समजते. घरी एकटाच राहत असलेल्या प्रशांतचे व्यसन वाढले होते. त्यातच काही दिवयपापासुन रोजगार ही बंद झाल्याने घरातल्या घरात राहून त्याच्या नैराश्यात वाढ झाली होती. त्याने रविवारी सायंकाळी 6 वाजता घराच्या पंख्याला साडीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याचे त्याच्या आप्तीयांनी सांगितले. घरी डबा घेऊन गेलेल्या त्याच्या आईला तो लटकलेल्या अवस्थेत दिसला. शेजारच्यांच्या मदतीने त्याला दवाखाण्यात नेले असता डॉक्टरांनीत्याला मृत घोषित केल्याची माहिती आहे. पुढील तपास चांदूर रेल्वे पोलीस करित आहे.