खाकीतला देवमाणूस ! उपासमारीची वेळ आलेल्या कामगारांना केले धान्याचे वाटप चांदुर बाजार बादल डकरे

0
733
Google search engine
Google search engine

खाकीतला देवमाणूस ! उपासमारीची वेळ आलेल्या कामगारांना केले धान्याचे वाटप

चांदुर बाजार बादल डकरे

हातावर पाेट असणाऱ्या कामगारांचे लाॅकडाऊनच्या काळात हाल हाेत असल्याने चांदुर बाजार येथील पाेलिसांनी या नागरिकांना धान्याचे वाटप केले.

खाकी वर्दीतील पोलीस म्हणले की भल्या भल्यांच्या मनात भिती निर्माण होते.परंतु पोलिसांमध्येही माणुसकीचा धर्म असतो याची प्रचिती चांदुर बाजार भागात पहायला मिळाली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाउन करण्यात आले आहे. केवळ जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठीच नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे. विनाकारण घराबाहेर पडणा-या नागरिकांना पोलिसांकडून काठ्यांचा प्रसाद देण्यात येत आहे. लॉक डाऊनच्या परस्थितीमुळे हातावर पोट असलेल्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

दिनांक 29 मार्च 2020 ला चांदुर बाजार पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या चांदुर बाजार दुय्यम पोलीस निरीक्षक अशोक कांबळे यांनी आपले सहकारी सहायक पोलीस निरीक्षक पंकज दाभाडे आणि सर्व पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने चांदुर बाजार परतवाडा रोडवर असलेल्या परिसरात विविध ठिकाणी असणाऱ्या लेबर कॅम्प वसाहतीत जाऊन येथील कुटुंबाला एक आठवड्याचे जीवनावश्यक वस्तू दिल्या. तांदूळ, पीठ, साखर, चहापावडर, साबण आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या निमित्ताने कोरोना विषाणूच्या संकटात पोलिसांतील माणसाचे व माणुसकीचे दर्शन घडले.

पोलीस कर्मचारी विनोद इंगळे,दिलीप मुळे ,पंकज फाटे शान यांनी वाटप केले.