आकोटात बाहेर जिल्ह्यातुन आलेल्या व्यक्तींना होम काॕरंन्टाईनचा सल्ला

0
700

आकोटःसंतोष विणके 

प्रशासनाद्वारा शोध मोहीम…

कोरोना च्या प्रादुर्भावामुळे अकोट शहरात जिल्हा बाहेरून दाखल झालेल्या व्यक्तींची तपासणीसह ट्रॕव्हल हीस्ट्रीची नोंद घेण्यासाठी विशेष शोध मोहीम राबवण्यात येत आहे. यामोहीमेत 422 व्यक्तींची नोंद घेऊन त्यांना होम क्वारंटाईनच्या सुचना देण्यात आल्याचे पालीकेच्या सुत्रांनी सांगीतले.

मुंबई पुणे नागपुर व बाहेरुन आलेल्या व्यक्ती ची तपासणी करुन सर्व व्यक्तींना शोधून कोरोना प्रादुर्भावाची लक्षणे आहेत किंवा नाही याबाबतची चौकशी करणे व चौदा दिवस त्यांना होम कोरंटाइन मध्ये ठेवून त्यांच्यावर वेळोवेळी लक्ष ठेवणे संदर्भात पालीकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची तातडीने मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी बैठक घेतली.व अकोट शहरात जिल्हा बाहेरून आलेल्या व्यक्तींची शोध मोहीम राबवून त्यांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले.ही शोध मोहीम अद्याप सुरू आहे.

तसेच नगर परिषद मार्फत पालीकेच्या शाळांमध्ये बेघर व्यक्तींच्या निवाऱ्याची सुद्धा सोय करण्यात आली आहे. पालीके मार्फत सर्व प्रभागात तसेच वर्दळीच्या ठिकाणी आरोग्य विभागाद्वारा सतत फवारणी सुरू असून स्वच्छतेबाबत मुख्याधिकारी डोल्हारकर, अधिकारी व कर्मचारी गंभीरतेने लक्ष ठेवत आहे.

नागरीकांच्या मदतीकरीता आपत्तीनिवारण कक्ष

  • अकोट नगर परिषद मधे आपत्ती व्यवस्थापन कक्ष उघडण्यात आला असून नागरिकांची सुविधा करिता हा कक्ष 24 तास सुरू ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी 07258 – 220083 या क्रमांकावर आपल्या तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहन मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी केले आहे.