शेती कर्ज परतफेडीच्या मुदतवाढीच्या निर्णयाने शेतक-यांना दिलासा

0
1011
Google search engine
Google search engine

————————-
३१मे पर्यत करता येईल कर्जाची परतफेड
————————-
आकोट
कोराना आपत्तीने जनजीवन ठप्प झाले आहे.सर्व व्यवहार देखील प्रभावित झाले या पार्श्वभूमीवर शेती संबधीत कर्ज विशेषतः बिनव्याजी कर्जाच्या परतफेडीची मुदत ३१ मे पर्यत वाढविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.या निर्णयाने शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोना संकटकालिन स्थितीत जनजीवन विस्कळीत झाले आहे.आर्थिक व्यवहार देखील थांबले आहेत.शेतकरी शेतीमालाची विक्री करु शकले नाहीत.शासनाचे शेतमाल खरेदी केंद्र बंद पडले.अशा बिकट परिस्थितीत आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना शेती विषयक कर्जाची परतफेड कशी करावी अशा प्रश्न निर्माण झाला होतो..हे लक्षात घेवून सदरहू कर्जाची परतफेड करण्याची मुदत वाढविण्यात यावी अशी शेतक-यांची मागणी पुढे आली. जिल्हा सहकारी व राष्ट्रीयकृत बॕकेच्या व्यवस्थापनाकडून तसा प्रस्ताव पाठविण्यात आला.जिल्हा सहकारी बॕकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक सहकार नेते रमेश हिंगणकर यांनी केंद्र राज्य शासनाला निवेदन पाठवून या मागणीचा सतत पाठपुरावा केला होता

.या मागणीची केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाने यथोचित दखल घेवून शेती संबधी कर्जाच्या परतफेडीची मुदत ३१मे २०२० पर्यंत वाढविण्याबाबत आदेश निर्गमित झाल्याने शेतक-यांना मोठा दिलासा दिला आहे.या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी , मुख्यमंत्री उद्वव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना रमेश हिंगणकर यांनी धन्यवाद दिले आहेत.युवक काॕग्रेसचे प्रदेश प्रवक्ता कपिल ढोके यांनी केंद्र व राज्य शासनाकडे कर्ज परतफेडी च्या मुदतवाढीची मागणी रेटून धरली होती.या संदर्भात केंद्र शासनाचे कृषी मंत्रालयाचे आदेश निर्गमित झाले असून या निर्णयान्वये शेतक-यांना कर्जाची परतफेड ३१ मे २०२० पर्यत करता येईल व नियमित बिन व्याजी कर्जदारांना व्याज भरावे लागणार नाही.

तथापि सर्व प्रकारच्या बिगरशेती कर्जाला तीन महिन्यांची मुदत दिली असुन शेतकरी कर्जाची मुदतवाढ दोन महिन्यांची का असा प्रश्न विचारला जात आहे.ही मुदत ३० जुन पर्यंत वाढवावी अशी अपेक्षा रमेश हिंगणकर यांनी व्यक्त केली आहे.*