लिबर्टी परिवार व ओम साई ग्रुपने मुलभुत साहीत्य संच देऊन जोपासली सामाजिक बांधिलकी!!

Google search engine
Google search engine

सांगली/ कडेगांव

कडेगांव मध्ये सामाजिक उपक्रमात नेहमीच आघाडीवर असणाऱ्या लिबर्टी परिवार व ओमसाई ग्रुप यांचे कडून कोरोना प्रादुर्भाव सारख्या महाभयंकर संकटाच्या काळात बाहेरच्या परराज्यातील लोकांना सध्या कडेगांव तालुक्यात १४४ कलम लागु असल्यामुळें कोणतेही हाॅटेल,ढाबा बंद असल्यामुळे त्यांच्या जेवणाची व्यवस्था होत नसलेने मदतीचा हात म्हणून आटा, डाळ, तांदूळ, तेल, मीठ यांसरखे मूलभूत साहित्याचा संच, मा.तहसीलदार डॉ शैलजा पाटील, कडेगाव, गटविकास अधिकारी पं. स.कडेगाव, मुख्याधिकारी नगर पंचायत, कडेगाव यांना सुपूर्द केला.यावेळी कडेगांवचे सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणारे सामाजिक बांधिलकी जोपासणारे मा.श्रीजय देशमूख (बापू), नगरपंचायतीचे विरधी पक्ष नेते नगरसेवक मा.उदय देशमुख मा.प्रकाशशेठ तडसरे, मा.सुहास कराडकर(बाबा) इत्यादी मान्यवर उपस्थित होते