लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरीकांना फराळवाटप

0
821

आकोटःसंतोष विणके

सध्या कोरोना विषाणुमुळे संपुर्ण भारतात लॉक डाऊन करण्यात आले आहे.त्यामुळे इतर शहरातील,गावातील काही नागरीक आकोट शहरात अडकलेले आहेत. या अडकलेल्या नागरीकांची राहण्याची व्यवस्था न.प.शाळा क्र.७ मध्ये करण्यात आलेली आहे.

निवारा मिळालेल्या नागरीकांना मुख्याधिकारी डी डी डोल्हारकर यांच्या मार्गदर्शनाखाली आकोट नगर परिषदेतील,आरोग्य निरिक्षक श्री चंदन चंडालीया,पाणीपुरवठा अभियंता श्री रोशन कुमरे,अग्नीशमन अधिकारी श्री रूपेश जोगदंड,विहित अभियंता श्री नंदन गेडाम व ग्रंथपाल श्री संजय बेलूरकर तसेच श्री इरफान अहमद,सचिन तेलगोटे इत्यादी कर्मचा-यानी फराळाचे वाटप केले

.

न.पा.आरोग्य व विविध विभागातील अधिकारी कर्मचारींनी या आपातकालीन परीस्थीतीत लढतांनाही सामाजीक जाण ठेऊन दिलेला माणुसकीचा परीचय हा कौतुकास्पद आहे.