संतनगरीतुन देणगी देणारे काशेलानी परिवार ठरले पहिले दानशूर परीवार…

0
1239
Google search engine
Google search engine

संतनगरीतुन देणगी देणारे काशेलानी परिवार ठरले पहिले दानशूर परीवार…

शेगांव :- देशामध्येच नव्हे तर अवघ्या विश्वाला संकटमध्ये ओढावून घेणाऱ्या कोरोना कोविड – 19  व्हायरस ने जो थैमान घातला आहे त्याला अवघे जग आपल्या परीने जोखमीने सामना करत असून अनेक देशांतील सरकारे प्रयत्नांची परिकाष्टा करत असून त्याला आपला भारत देश ही अपवाद नाही.
कोरोना कोविड – 19  व्हायरस ज्या गतीने महाकाय आणि भयावह प्रलायप्रमाने स्वतःला गुणाकार पद्धतीने पसरवित आहे अश्या या गर्द अंधारात आशेचे किरण दिसत आहे ते दानशूर व्यक्तींच्या रूपाने…
भारतात अनेक दानशूर व्यक्ती समोर येऊन आपल्या परीने फुल ना फुलाची पाकळी कोरोना व्हायरसच्या सामन्यासाठी दाने देत असून यांच्या रांगेत संतनगरीतून अर्थातच शेगांवातून नाव पुढे आले आहे ते स्व. फिरयामल  मोतिलाल काशेलानी यांच्या स्मृति पित्यार्थ आज त्यांचे पुत्र रमेश काशेलानी व मनोज काशेलानी यांनी देशावर आलेल्या नोव्हल कोरोना नावाच्या आपत्तीला भारतातुन बाहेर करण्याकरीता आपले पाऊल पुढे टाकले आहे. ज्या प्रमाणे केंद्र सरकार व राज्य सरकार पूर्ण जोमाने तसेच युद्ध पातळीवर अतोनात प्रयत्नशिल आहे तथा गोरगरीबांची मदत करीत आहे याचीच जान्हिव ठेऊन, कशेलानी परिवाराने देशहितासाठी आपले कर्तव्य समजून, एक पाऊल पुढे टाकून, आपले नाव या काळात सरकारच्या खांद्याला खांदा लावून उभे असलेल्या दानशूर व्यक्ती मध्ये सामावून घेतले आहे. काशेलानी परिवार शेगांव तहसिल कार्यालयात जावुन मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोषामध्ये एक लाख एक हजार रुपये (₹१,०१,०००) ची देणगी दिली तर, या आपत्तीच्या काळात सर्व धणवान तसेच ज्यांच्या जवळ आहे त्यांनी व देशाच्या सर्व नागरीकांनी होईल तितकी मदत शासनाला करावी असे जेणे करून आपले राज्य व आपला देश या संकटकाळी मजबुतीने उभा राहिल असे आवाहन देखील केले.
महत्वाचे म्हणजे संतनगरीतुन देणगी देणारे काशेलानी हे पहिले दानशूर परीवार ठरले असून त्यांच्या या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.