अकोटात आजपासुन मिळणार ५ रुपयात शिवभोजन थाळी

0
1747
Google search engine
Google search engine

आकोटः संतोष विणके

कोरोनाचे आपात्कालीन स्थितीत गरजूंना सहारा

महाराष्ट्र शासनाच्या वतीने अल्पदरात भोजन देणाऱ्या शिव भोजन थाळीची सुविधा दि.१ एप्रील पासुन आकोटमध्ये उपलब्ध झाली आहे. इच्छापूर्ती महिला बचत गटाद्वारा ही सुविधा बस स्टँड जवळ उपलब्ध असणार आहे.अवघ्या पाच रुपयात भोजन देणाऱ्या या सुविधेचा फायदा अकोटमधील जनतेला मोठ्या प्रमाणात होणार आहे.

तहसीलदार राजेश गुरव यांच्या हस्ते औपचारिकरित्या गरजुंसाठी ही सुविधा आजपासुन उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यावेळी अकोट नगर परिषदेचे उपाध्यक्ष अब्रार खा शमशेर खा, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, तहसील कार्यालयाचे पुरवठा अधिकारी टी.डी.चव्हाण, मंडळ अधिकारी पी.व्ही. सायरे, तलाठी नरेश रतन तसेच अकोट न.पा. कार्यालय अधीक्षक गौरव लोंदे, प्रशासन अधिकारी प्रदीप रावणकर, ग्रंथपाल संजय बेलुरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.