*संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एप्रिल 2020 पासून सुरु होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित*

0
2850

सर्व परीक्षा नवीन वेळापत्रकानुसार होणार

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी 2020 च्या प्रसिद्ध झालेल्या वेळापत्रकानुसार एप्रिलमध्ये सुरू होणाऱ्या सर्व परीक्षा कोरोना विषाणू (कोव्हीड -19) मुळे व देशभर लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आणि विद्यापीठ व सर्व संलग्नित महाविद्यालये बंद ठेवण्यात आल्यामुळे स्थगित करण्यात आल्या आहेत. परीक्षांमध्ये उन्हाळी 2020 लेखी व प्रात्यक्षिक सर्व परीक्षांचा समावेश असून याबाबतचे परिपत्रक परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी प्रसिद्ध केले असून ते विद्यापीठ वेबसाइट www.sgbau.ac.in वर दर्शनी भागावर दिलेले आहे. स्थगित सर्व उन्हाळी 2020 परीक्षेचे वेळापत्रक नव्याने तयार करण्यात येणार असून नवीन वेळापत्रक यथायोग्य कळविण्यात येणार आहे, याची सर्व संबंधित विद्यार्थी, पालक, प्राचार्य, शिक्षक व इतरांनी नोंद घ्यावी असे विद्यापीठाच्यावतीने संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी कळविले असून सर्वांनी कोरोना विषाणूपासून संसर्ग टाळण्यासाठी आपल्या घरीच राहावे व स्वतःचे रक्षण करावे असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी सर्वांना केले आहे