शिरजगाव कसबा पोलिसांची गावठी दारू वर कार्यवाही तर चांदुर बाजार पोलिसांनी केला गावठी दारूचा अड्डा वर धाड 5 आरोपी फरार तर एक अटक

0
750
Google search engine
Google search engine

शिरजगाव कसबा पोलिसांची गावठी दारू वर कार्यवाही तर चांदुर बाजार पोलिसांनी केला गावठी दारूचा अड्डा वर धाड
5 आरोपी फरार तर एक अटक

चांदुर बाजार:-

कोरोना या विषाणू बाबत काही जण गंभीर नसल्याने याचा प्रादुर्भाव आपल्या कडे पण वाढू शकतो याबाबत अवैध धंदे करणारे याना जाणीव नसल्याचे दाखवत गावठी दारू,गुटखा,अवैध वाळू तस्करी जोरात करत आहे.यावर तालुक्यातील चारही पोलीस स्टेशन हद्दीत बिट जमादार यांची कार्यवाही ही न होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढले आहे.

शिरजगाव कसबा पोलिसांना मिळालेल्या माहिती च्या धारे त्यांनी ग्राम बोदळ रोड वरील शेताजवळ फरार ईश्वर मनोहर लवटे वय 36 वर्ष रा. मच्छीसात करजगाव पो स्टे शिरजगाव कसबा आरोपीला पोलिसांची चाहूल लागताच पळून गेला त्याने मोक्यावर एका प्लास्टिक डबकीत 3 लिटर गा. हा.भ. दारू व रबरी ट्यूब मध्ये 25 लिटर गा. हा. भ. दारू असा एकूण 28 लिटर गा. हा. भ. दारू रबरी ट्यूब व डबकी सह कीं.अं. 3000/- रुपये चा प्रोव्ही माल मिळून आला. तसेच सुरेश सबुलाल धांडे वय 29 वर्ष रा. मांगीया पो स्टे शिरजगाव कसबा आरोपीवर पंचासमक्ष प्रोव्ही रेड केला असता, आरोपीचे ताब्यातून 4 लिटर गा. हा.भ. दारू कीं.अं. 400/- रुपये व 1 स्टील ग्लास कीं अं 10 असा एकूण 410 रुपये चा प्रोव्ही माल मिळून आला, तसेच आरोपी याने भारत सरकार/ महाराष्ट्र सरकार यांनी COVID-19 या आजार संबंधाने संपूर्ण देशात लॉक डाऊन घोषित केले असून, सदर आरोपीने वरील आदेशाचे उल्लंघन केले, वरून सदरचा गुन्हा दाखल करून तपासात घेतला.सदर कार्यवाही अचलपूर एसडीपीओ पोपट अबदगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गोपाल उपाध्यय यांच्या टीम पोलीस कॉस्टबल सुरेश धाकडे ,संजय तायडे पोहेका संजय वंजारीयांनी केली.

दिनांक 30 मार्च दुपारी 5 च्या दरम्यान कोरोना या विषाणू च्या पार्श्वभूमीवर चांदुर बाजार तालुक्यातील विरुळपूर्णा या ठिकाणी पेट्रोलीग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रेड केली असता यामध्ये गावठी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सडवलेले मोह,गावठी दारू असा एकूण 30500 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पुढील तपास सुरू आहे.सदर कार्यवाही ही अचलपूर पोलीस उपविभागीय अधिकारी पोपट अबदगिरे ,ठाणेदार उदयसिग साळूके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील खंडारे, पोलीस हेड कॉस्टबल दिलीप मुळे यांची टीम सहायक फौजदार दीपक खंडारे,पोहेका वसंत जाधव,पोका पंकज फाटे ,श्याम सोनोने, मंगेश मस्के. यामध्ये चार आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही करत आहे.