खबरदार…विनाकारण लॉकडाऊनचे उल्लंघन कराल तर वाहन होईल जमा

0
877
Google search engine
Google search engine

वाहतुक निरीक्षक गजानन शेळकेंची धडक मोहीम

अकोलाःप्रतिनिधी

लॉकडाऊनला आठवडा झाल्या नंतर ही अकोलेकर कोरोनाच्या संकटासमोर गंभीर झाल्याचे दिसून येत नाही आहे, शेजारील बुलडाणा जिल्ह्यात करोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यावरही संचारबंदीत छोट्या मोठ्या कारणासाठी बाहेर पडत आहेत. अशा विनाकारण रस्त्यांवर बाहेर पडणाऱ्या  वाहनधारकांचे वाहन वाहतूक शाखेत लावण्याची धडक कारवाई  सुरू करण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाने संध्याकाळी 6 वाजे पर्यंत जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या दिलेल्या परवानगीचा गैरवापर करून काही अकोलेकर रस्त्यावर बाहेर पडतांना दिसून येत आहेत, पोलिसांनी अडविले तर दवाखान्यात चाललो, औषधी आणायला चाललो, भाजी, किराणा, दूध आणायला चाललो असे सांगून सुटका करून घेतात,  शेवटी आज पोलीस अधीक्षक अमोघ गावकर ह्यांचे निर्देशाने शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी मोहीम तीव्र केली आहेतसेच विनाकारण रस्त्यावर वाहने आणणाऱ्या मोटोरसायकल, ऑटो व इतर वाहनांना वाहतूक शाखेत लावण्याचा सपाटा सुरू केला असून विनाकारण रस्त्यावर वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांना पोलिसी खाक्या दाखविणे सुरू केले आहे.याअंतर्गत अनेक वाहने कार्यलयात लावली आहेत, ही मोहीम अधिक कडक करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी दिला आहे.