नाभिक समाजातील गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

0
450
Google search engine
Google search engine

अकोट:ता.प्रतिनिधी

कोरोना आपत्ती काळात नाभिक समाजातील प्रतिनिधींनी मिळून समाजातील गरीब व गरजू सलून कारागीर बांधवांच्या कुटुंबीयांना मदत केली.या गरजुंना दैनंदिन जीवनातील जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य व किराणामालाचे वाटप करण्यात आले.पुर्ण जगात जागतिक महामारी कोरोना वायरस विषाणू संसर्ग संकटामुळे शासनाच्या आदेशानुसार सर्वच क्षेत्रात लाॕकडाऊन केल्याने नाभिक समाजातील शेकडो सलून बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांची उपजीविका बंद झाली आहे.अश्या संकटसमयी समाजातील गरजू समाज बांधवांना समाजातील संजय भट्टी व इतर दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला. यावेळी या अन्नधान्य वाटपासाठी गजानन कळसकर संतोष हीरपूरकर सुरेश अंबुलकर मनीष भट्टी अनिकेत अंबुलकर जीवन पाटील अभिजित सातव आदींनी सहकार्य केले.