लॉक डाऊन मध्ये पोलिसाने दिले माणुसकीचे दर्शन पोलीस कॉस्टबल पंकज फाटे आणि विनोद इंगळे याचे सर्व स्तरावर कौतुक अमरावती :- बादल डकरे

0
1242
Google search engine
Google search engine

लॉक डाऊन मध्ये पोलिसाने दिले माणुसकीचे दर्शन

पोलीस कॉस्टबल पंकज फाटे आणि विनोद इंगळे याचे सर्व स्तरावर कौतुक

अमरावती :- बादल डकरे

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काही दिवसांपासून लॉकडाउन सुरू आहे.त्यामुळे अनेक मजुरी करता करणार्या, गरीब कुटुंबांचा रोजगार हिरावला गेला आहे. परिणामी तालुक्यातील अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. याची दखल घेत तिन पोलीस कर्मचार्‍यांनी ,शहरातील बारा कुटुंबीयांना मदतीचा हात दिला. या कुटूंबांना जिवनावश्यक वस्तुंचा पुरवठा,या पोलीस कर्मचार्‍यांकडून करण्यात आला.या मदतीने बाराही कुटुंबीयांची उपासमार काही प्रमाणात का होईना टळली आहे.
लॉकडावून मध्ये कामाचा ताण असुनही पोलिस कर्मचार्‍यांनी, गरजूंना मदतीचा हात देऊन मानवतेचा संदेश दिला आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने १0 दिवसांपूर्वी संचारबंदी जाहीर केली .त्यानुसार नागरिकांना रस्त्यावर फिरण्यास तसेच जमाव करण्यास मनाई करण्यात आली आहे. परंतु काही टवाळखोरांना पोलिसां नाईलाजास्तव, लाठ्यांचा प्रसाद ही द्यावा लागला. त्यामुळे पोलीस प्रशासनाविषयी सामान्य नागरिकांमध्ये अनेकदा रोष दिसून येतो. मात्र प्रसंगी कठोर होणार्‍या पोलिसांच्या मनातही मानवतेचा झरा वाहतअसतो. हे पोलिसांनी शहरातील बारा कुटुंबियांना मदती देऊन लोकांना दाखवून दिले.यावेळी ज्या गरीब कुटुंबाना पोलिसांनी कठीण समयी मदत केली, त्या कुटुंबीयांनी भारावून जाऊन पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. स्थानिक पोलिस स्टेशनचे शिपाई पंकज फाटे, विनोद इंगळे व जिल्हा नियंत्रण कक्षाचे कर्मचारी मनोज चेतरे, या तीन पोलीस कर्मचारिणी मदत करीता पुढाकार घेतला होता. त्यानुसार प्राथमिक स्तरावर १२ गरीब कुटुंबीयांची निवड करून त्यांना अन्नधान्य सह मसाले पदार्थ व दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा पुरवठा केला. चांदूरबाजार पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांच्या हस्ते या कुटुंबियांना हे साहित्य देण्यात आले. याप्रसंगी पोलीस कर्मचारी किरण बांबल, संजय मांडवकर, भूषण पेठे, पृथ्वीराज राठोड, सुनील खंडारे, निकेश नशिबकर, विरेंद्र अमृतकर, विद्याधर वंजारी, सचिन डुकरे सह पोलीस मित्र मुंतजीर खान उपस्थित होते. यापूवीर्ही स्थानिक पोलिस स्टेशनचे खुपिया विभागाचे शिपाई वीरेंद्र अमृतकर व निकेश नशिबकर यांनी कोणताही गाजावाजा न करता बेलोरा मार्गावरील पारधी कुटुंबीयांना घरपोच जिवनावश्यक वस्तूंची मदत केली होती. पोलीस शिपायांच्या या मदतीने पोलिसातील देवपण नागरिकांना दिसून आल. असल्याची भावना या गरीब कुटुंबीयांनी यावेळी व्यक्त केली.कायदा व सुव्यवस्थे साठी कठोर वागणार्‍या, पोलिसांचे हृदयही मेणापेक्षा मऊ असते.हे यावरून स्पष्ट होते.