येवदा येथील मृत महिला पोलीस कर्मचा-याचा रिपोर्ट निगेटिव्ह

2776

अमरावती :-

जिल्ह्यातील येवदा येथील महिला पोलीस कॉन्स्टेबलचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांचा थ्रोट स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आला. तथापि, या महिला पोलीस कर्मचा-याचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.

येवदा पोलीस ठाण्यात या महिला पोलीस कर्मचारी कार्यरत होत्या.  त्या जुन्या आजाराने त्रस्त होत्या. त्यावरील उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांना कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक आहे. त्यामुळे कोणीही उलटसुलट चर्चा करू नये व अफवा पसरवू नयेत, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक हरी बालाजी यांनी केले आहे.

 

 

जाहिरात