कोरोना : कंत्राटी आरोग्य कर्मचारी यांना कायम करा – कंत्राटी कर्मचारी महासंघ # समान काम, समान वेतन देण्याची मागणी

1420

मुंबई. (विशेष प्रतिनिधी) – संपूर्ण जगभरा सहीत देशात तसेच राज्यात थैमान घातलेल्या कोरोना विषाणू शी मुकाबला करण्याऱ्या “रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा” असे ब्रीदवाक्याप्रमाणे आरोग्य विभागातील सर्व कंत्राटी कर्मचारी यांना सेवेत कायम करा अशी लेखी मागणी महा. राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना ईमेल द्वारे मागणी केली आहे.

दरम्यान महासंघाचे अध्यक्ष मुकूंद जाधवर म्हणाले की, महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागात कार्यरत जवळपास 19500 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोरोना च्या पाश्वभूमीवर नियमीत कर्मचाऱ्यांप्रमाणे “समान काम, समान वेतन आणि आरोग्य विभागात रिक्त असलेल्या पदांवर समायोजित करून घ्यावे. त्याच बरोबर आता सध्या कोरोना च्या पाश्वभूमीवर राज्य शासनाने पद भरती कंत्राटी पद्धतीने चालू केलेली आहे. ती फक्त 3 महिन्यासाठी कोरोना संदर्भात चालू केलेली आहे. त्या पदावर हजर होण्यासाठी कर्मचारी इच्छुक नाही आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाला खूप मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागणार आहे. तर भविष्य काळात रिक्त होणाऱ्या पदांवरती कोरोना मध्ये काम केलेल्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचे शासनाने हमी द्यावी त्याचबरोबर केंद्र शासनाने व राज्य शासनाने मिळून कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचारी प्रमाणे जीवाची बाजी लावून काम करत आहेत त्यांना कायमस्वरूपी सेवे मध्ये घ्यावे अशी विनंती करत मागणी जाधवर यांनी केली आहे.

यावेळी अध्यक्ष मुकूंद जाधवर, मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी, कार्याध्यक्ष सचिन जाधव, कोषाध्यक्ष विकास डेकाटे, राज्य सचिव बाबासाहेब कोकाटे, सह कार्याध्यक्ष सचिन पाटील, सरचिटणीस शहाजी नलावडे आदी कंत्राटी कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते

जाहिरात