अवैध गावठी दारूवर धाड 64 हजारांचा मुद्देमाल जप्त

0
653

ठाणेदार दीपक वानखडे यांच्या नेतृत्वात चांदूर रेल्वे पोलीसांची कारवाई

चांदूर रेल्वे –

संचारबंदी लागु झाल्याने देशी – विदेशी व सर्व दारूंची दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांनी आपला मोर्चा गावठी मोहा दारूकडे वळविल्यामुळे ही दारू सुध्दा आता मोठ्या प्रमाणात सगळीकडे गाळण्यात येत आहे. असे असले तरी चांदूर रेल्वे तालुक्यात अवैध दारूवर कारवाईचा सपाटा सुरूच आहे. शनिवारी सकाळी ७ वाजता च्या सुमारास चांदूर रेल्वे तालुक्यातील गौरखेडा येेथे दोन ठिकाणी अवैध गावठी दारूवर धाड टाकुन ६४ हजारांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. ही कारवाई ठाणेदार दीपक वानखडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गौरखेडा परिसरात मोठ्या प्रमाणात गावठी दारू गाळल्या जात होती. ही माहिती चांदूर रेल्वे पोलीसांना मिळताच पोलीसांनी धाड टाकुन १६ ड्रम मोहा सडवा व गावठी दारू, ५ पाणी ड्रम, २ लोखंडी ड्रम, ७ जर्मनी टोपले असा एकुण ६४ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला तर मोहा सडवा नष्ट करण्यात आला. यामध्ये आरोपी राहुल सुभाष पवार (२४) व राजेश्री सनोज पवार (२४) दोघेही रा. गौरखेडा हे फरारीत आहे. आरोपींविरूध्द ६५ फ, ड मुंबई दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरिक्षक दीपक वानखडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरिक्षक गिता तांगडे, पीएसआय राहुल चौधरी, गणेश मुपडे, एएसआय संजय राठोड, पोलीस हवालदार अविनाश देशमुख, श्रीकृष्ण शिरसाट, पोलीस नाईक गणेश घुले, संदिप शिरसाट, पुरूषोत्तम यादव, पो.कॉ. शेख गणी, नरहरी मुरकुटे, रूपेश धारपवार, अविनाश वाघमारे, शरद खेडकर, विजय तिवारी, आशिष राऊत, अरविंद गिरी, महिला पो.कॉ. आरती कुंजेकर, निलीमा बांते, शारदा मडगे व १ आर. सी. पी. पथक यांनी केली.