एम के सी संत्रा फ्रुट कंपनी तर्फे कोरोना ग्रस्त मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये केली १ लक्ष ११ हजार १११ रुपायांची मदत :-   आमदार देवेंद्र भुयार यांच्या मार्फत धनादेश 

0
1598

 

वरुड तालुका प्रतिनिधी /
देशात उद्भवलेल्या परस्थितीचा केंद्रसरकार व महाराष्ट्र राज्य सरकारने अतिदक्षतेने सामना करत आहे. संसर्गजन्य रोगामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता  लाखोंजनांचे हात मदतीसाठी पुढे सरसावले आहेत त्यातच छोटेसे कर्तव्य म्हणून वरुड तालुक्यातील नामांकित संत्रा व्यापारी एम के सी फ्रुट कंपनीचे मालक सोनू सेठ यांनी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या मार्फत मुखमंत्री सहाय्यता निधीत १ लक्ष १ हजार १११ रुपये मदत जमा केली आहे.
देशामध्ये वाढलेले कोरोना रोगाचे थैमान, वाढते कोरोना विषाणू चे संक्रमण आणि रोगाच्या साथीबरोबरच देशावर आर्थिक संकट उभे राहिले आहे.  देश आर्थिक संकटात सापडला आहे पहिलीच देशाची आर्थिक परिस्थिती खालावलेली असताना त्यात कोरोनाच्या महामारीचा फटका आर्थिक व्यवस्थेला बसला आहे. राज्य सरकार आपापल्या परीने जनतेची सुरक्षा ,हीत आणि आरोग्य लक्षात घेऊन उपाययोजना करत आहे.
आपण भारतीय म्हणून प्रत्येक व्यक्तीचं आपल्या मातीची नाते जोडलेल आहे. देशात महामारीमुळे उभे टाकलेल्या  संकट काळात प्रत्येकाने आपली जिम्मेदारी आणि जबाबदारी ओळखून आणि काळाची पावले ओळखून या संकटाचा मुकाबला करण्याचे ध्येय ठेवले पाहिजेत हीच भावना मनात ठेवून या उद्भवलेल्या संकटमय परिस्थितीत आपल्या कुवतीप्रमाणे सरकारला सहाय्यता करण्याचे काम केले पाहिजे ही भूमिका ठेऊन वरुड तालुक्यातील नामांकित संत्रा व्यापारी एम के सी फ्रुट कंपनीचे मालक सोनू सेठ  यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये  आमदार देवेंद्र भुयार यांच्या मार्फत १ लक्ष ११ हजार १११ रुपयाची मुख्यमंत्री सहाय्यता मदत निधी जमा केली आहे.
आमदार देवेंद्र भुयार यांच्या मार्फत एम के सी फ्रुट कंपनी चे मालक सोनू शेठ यांनी मुखमंत्री सहायता निधीत  एक लक्ष अकरा हजार एकशे अकरा रूपयांची मदत दिली आहे यावेळी एम के सी फ्रुट कंपनीचे मालक सोनू सेठ आमदार देवेंद्र भुयार , आरोग्य सभापती योगेश्वर चौधरी, माजी पं. स. सभापती निलेश मगर्दे, रोशन दारोकर, प्रफुल्ल अनासाने, निखिल बनसोड शेख युनूस , गौस अली , यांच्या उपस्थितीत आमदार देवेंद्र भुयार यांना १ लक्ष ११ हजार १११ रुपयांचा धनादेश केला सुपूर्द केला .
वरुड शहरांमधून  मुख्यमंत्री सहाय्यता मदत निधी फंडात मदत करणारे एम के सी संत्रा फ्रुट कंपनीचे मालक सोनू सेठ संत्रा व्यापारी पाहिले ठरले असल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली . हे काम नक्कीच प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारे आहे.