त्या’ नगरसेवकाला आहे आपल्या पालकत्वाची जान !

0
709
Google search engine
Google search engine

नगरसेवक असावा तर असाच – प्रभागा मधील नागरिकांचे मत

शेगांव :- देशातील विविध भागात भिन्न भिन्न प्रांतात, राज्याराज्यांत, नगरशहरात, खेड्यापाड्यात अर्थातच गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत भारत देशातील प्रशासनापासून सामन्यातील सामान्य नागरिक युद्ध करतोय, स्वतः झटतोय ते कोरोना नावाच्या असुरी व्हायरसशी ते ही घरात राहून…!
आज सर्वत्र लॉक डाऊन ची स्थिती असून अनेक शासकीय यंत्रणा आपले काम आपले कर्तव्य निःसंशय पणे कटाक्षाने बजावित आहे त्यात देशातील कर्तव्यदक्ष पोलिस यंत्रणा, डॉक्टर, स्वच्छता विभागाचे कर्मचारी आपले काम आपला जीव मुठीत घेऊन करीत आहेत एका परीवारासारखे म्हणजेच भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत या प्रतिज्ञेची जान्हीव ठेवून.
कोरोनामुळे असलेले लॉक डाऊन हे केवळ सोशियल डिस्टंसिंगसाठी अर्थात सामाजिक दुरकिसाठी असून या संकटकाळी आपल्याला अत्यावश्यक सेवा मिळविण्यासाठी नागरिक घराबाहेर पडताना व घरात वावरतांना त्यांनी आपली नीट काळजी घ्यावी म्हणून कोरोनाचा प्रादुर्भाव त्यांच्यावर होऊ नये यासाठी शेगांव शहरातील प्रभाग क्रमांक ०५ मधील सुज्ञ नगरसेवक पवन महाराज शर्मा यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांचे पालकत्वाची जान ठेऊन प्रभागात मास्क वाटप केलेत त्यांच्याच खांद्याला खांदा लावून आरोग्य सभापती सौ.ज्योतीताई चांडक यांनी शहरात जंतुनाशकांची फवारणी करीत आपला प्रभागच नव्हे तर संपूर्ण शेगांव शहर सॅनिट्राईज केले ते हि स्वतः सोशियल डिस्टंसिंगचे नियम पाळत त्यांनी हे काम केले. या कार्याच्या जोडीला जोड म्हणून प्रभाग क्रमांक ०६ मध्ये सौ. मंगलाताई चव्हाण यांनी काम केले. प्रभाग क्रमांक ०५ मध्ये मास्कचे वितरण करीत असताना विनाकारण घराबाहेर पडू नका, नेहमी नेहमी हात धुवा, बोलतांना निदान ३ फुटाचे अंतर ठेवा, कोणी नवीन व्यक्ती आल्यास प्रशासनाला कळवा अश्या अनेक हितकारक सूचना नगरसेवक यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांना केल्या त्यांच्या या कार्यामुळे नागरिकांनी त्यांचा ‘नगरसेवक असावा तर असाच…’ असे म्हणून स्तुती केली.