पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला आकोटात जोरदार प्रतिसाद…!

0
942

आकोटःसंतोष विणके

दिपज्योती नमो स्तुते..!

 शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनास उत्स्फुर्त  प्रतिसाद मिळाला शहरवासियांनी मोदींच्या आवाहनाला नुसता प्रतिसादच नाही दिला तर दिप से दिप जलाते चलो… प्रेम की गंगा  बहाते चलो…या उक्तीचा प्रत्ययही दर्शवला.मोदींच्या आवाहनात सामिल होण्यासाठी घराघरात यावेळी उत्साह दिसुन आला

.रात्री ९ वाजता लोकांनी अंधार करत ९ मिनिटांपर्यंत  घराघरातील विजेचे दिवे बंद करुन टॉर्च,मेणबत्त्या,दिवे लावुन कोरोनाला हद्दपार करण्याचा निश्चय केला.यात बाल गोपालांसह महीला पुरुष  सर्वानी गो कोरोना गो चा संकल्प व्यक्त केला.

कोरोनाचे हे संकट लवकर परतुन जनजीवन सामान्य होण्याची आशा यावेळी प्रत्येकाच्या तोंडुन ऐकायला येत होती.शहरातील कॉलनी परीसर हा दिव्यांमध्ये लखलखत होता.९ मि. नंतर हळुहळु परत सर्व घरांमध्ये लाईट लावण्यात आले

.मोदींचे आवाहन पाळतांना जेवढा उत्साह दिवे मेणबत्त्या लावतांना होता तेवढाच उत्साह हा सोशल मिडीयावर दिसत होता.सेल्फी सम्राटांचा तर फेसबुक व्हाटसअपवर पुर आल्याचे दिसत होते.