संचारबंदीत बाहेर आल्यास आता कठोर कारवाई

1351

कोरोनाबाबत अकोलेकर केव्हा होणार गंभीर..?

संचारबंदीचे उल्लंघन करणारी ३५० वाहने जप्त

अकोलाःप्रतिनिधी

अकोला शहरात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासन वारंवार सुचना देत आहे.तरी देखील घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी होतांना दिसत नाही आहे.त्यामुळे पोलीस प्रशासना कडून आता वाहन जप्ती सारखी कठोर कारवाई करण्यात येणार आहे.यात विनाकरण वाहन बाहेर घेऊन पडणाऱ्याची वाहने जप्त करत त्यांच्या विरुद्ध जिल्हा पोलीस अधिक्षक अमोघ गावकर यांच्या आदेशानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.वाहतुक निरीक्षक गजानन शेळके यांनी विनाकारण वाहन घेऊन बाहेर पडत गर्दी करणाऱ्या ३५० वाहनं जप्त केली आहेत.यामध्ये मोठ्या प्रमाणावर चारचाकी वाहनांचाही समावेश आहे.वाहतुक शाखा कार्यालयाचा परीसर या वाहनांनी फुल झाला असुन आता संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नसुन पोलीसांद्वारा न ऐकणाऱ्याचा खास समाचार घेतला जाणार आहे.तसेच या वाहनधारकांवर दंडीत करुन त्यांची वाहने  जप्त करत शास्री स्टेडीयमला लावण्यात येत आहेत.हे सर्व पाहता अकोलेकर कोरोनाबाबत केव्हा होणार गंभीर..? असा लाख मोलाचा प्रश्न उपस्थित होतोय.अकोला जिल्ह्यात अजूनतरी करोना चा शिरकाव दिसून येत नाही, अकोला शहर व जिल्हा करोना मुक्त रहावा म्हणून सर्व शासकीय यंत्रणा रात्र दिवस काम करीत आहे,मात्र संचारबंदीला काही जण टवाळखोरीत घेत आहेत.त्यामुळं अश्यांवर पोलीस आता कारवाई करणार आहेत.पोलीस प्रशासन रात्रंदिवस दक्ष आहे, परंतु संचारबंदी असूनही जीवनावश्यक वस्तू व अतिआवश्यक रुग्णांना दिलेल्या सवलतीचा गैरफायदा घेऊन बरेच नागरिक आपली वाहने रस्त्यावर आणत आहेत,संचारबंदिचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध शहर वाहतूक शाखेने कंबर कसली आहे. पोलीस अधीक्षक अमोघ गावकर ह्यांचे निर्देशा प्रमाणे पोलीस निरीक्षक गजानन शेळके आपल्या कर्मचाऱ्यांसह शहरातील वेगवेगळ्या चौकात धडक कारावाई करत आहेत.

संचारबंदीत बाहेर आल्यास  कठोर कारवाई-पोलीस निरीक्षक गजानन शेळके

अकोला जिल्हा करोना मुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे व विनाकारण आपली वाहने घेऊन रस्त्यावरील गर्दी वाढवू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी अकोला शहरातील नागरिकांना केले आहे।संचारबंदीत बाहेर येणाऱ्यांवर  कारवाई करण्यात येईल

जाहिरात