……अखेर स्थानिक पोलिसांनी पकडला अवैध गुटखा ग्रामीण अधीक्षक यांच्या स्कॉड च्या कार्यवाही नंतर स्थानिक पोलिसांची कार्यवाही अमरावती /चांदुर बाजार:-

0
867
Google search engine
Google search engine

……अखेर स्थानिक पोलिसांनी पकडला अवैध गुटखा

ग्रामीण अधीक्षक यांच्या स्कॉड च्या कार्यवाही नंतर स्थानिक पोलिसांची कार्यवाही

अमरावती /चांदुर बाजार:-

                   चांदुर बाजार तालुक्यातील शहरात मोठं मोठे गुटखा गोदाम असून यावर स्थानिक पोलीस प्रशासन यांची अंकुश नसल्याने अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या स्कॉड ने स्थानिक पोलीस स्टेशन हद्दीत जवळपास 86000 रुपयांचा गुटखा जप्त केला होता.या कार्यवाहीमुळे स्थानिक पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशयास्पद व्यक्त केला जात होता.तरपोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी दिनांक 5 एप्रिल ला अवैध गुटखा वर कार्यवाही केली.
स्थानिक सैफी नगर चांदूर बाजार येथे आरोपी शेख फारुक शेख कादर यांच्या घरी रेड केली असता प्रतिबंद असलेला गुट्खा जर्दा पूड्या चा एकुण 38,070 /_ रु चा माल घरात मिडून आला.यावरून चांदुर बाजार शहरात मोठ्या प्रमाणावर गुटखा ची विक्री होत असल्याचे सिद्द होते आहे.तर अनेक दिग्गज या अवैध गुटखा तस्करी मध्ये सक्रिय असल्याचे बोलले जात आहे.

         ही कार्यवाही ठाणेदार उदयसिग साळूके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन रहाटे, सहायक फौजदार सुनील खंडारे,पोलीस स्टेशन कर्मचारी विरेंद्र अमृतकर,निकेश नाशिबकर,मंगेश मस्के,बोडखे,कासदेकर ,पोलीस हेड कॉस्टबल राठोड यांनी केली.