8आरोपी,6 मोटारसायकल तर लाखोंचा रुपयांचा मुद्देमाल जप्त शिरजगाव कसबा पोलिसांची कार्यवाही,गौवंश यांची जिवंत सुटका अमरावती/ चांदुर बाजार

0
1078
Google search engine
Google search engine

8आरोपी,6 मोटारसायकल तर लाखोंचा रुपयांचा मुद्देमाल जप्त
शिरजगाव कसबा पोलिसांची कार्यवाही,गौवंश यांची जिवंत सुटका

अमरावती/ चांदुर बाजार

                  शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या अवैध धंदे वर ठाणेदार गोपाल उपाध्यय आणि त्यांच्या टीम ने कार्यवाही केली असून यामध्ये वेगवेगळ्या कार्यवाही मध्ये 8 आरोपी 6 मोटरसायकल, 50 लिटर गावठी दारू  आणि 169130 रुपयांचा मुद्देमाल त्यांनी जप्त केला असुन या सर्व कार्यवाही त्यांनी दिनांक 4 एप्रिल ला प्रोव्ही रेड करून केल्या.

               या कार्यवाही मध्ये आरोपी राजेश भुरा धावडे वय 40 वर्ष ,याला कार्यवाही करून समजपत्र देऊन सोडण्यात आले होते मात्र लगेच पुढील कार्यवाही मध्ये तो  पकडला गेला.त्याच्या कडून मोटरसायकल क्रमांक MH27 R 2958 आणि एक विना क्रमांक मोटरसायकल जप्त करण्यात आली.आरोपी राजेंद्र विठ्ठल येवले वय 40 ,आरोपी विठ्ठल अजाबराव भालेराव वय 60 रा.कोदोरी चांदुर बाजार तालुका यांच्या कडून 10 लिटर गावठी दारू आणि मोटरसायकल MH 27 AK 4188 ,आरोपी चंदन धाकडे यांच्या कडून मोटरसायकल क्रमांक MH 31 CX 3596 ही गाडी आणि अवैध गावठी दारू जप्त करणयात आली.सतीश मंगल कुमरे वय 26 वर्ष प्रशांत यशवंत वाघाडे वय 35 वर्ष तर आकाश मनोहर सोनवणे वय 26 यांच्या कडून नंबर नसलेल्या दोन मोटरसायकल जप्त करण्यात आल्या.यांच्यावर विविध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

            दिनांक 4 एप्रिल 2020 ला   गौवंश यांची पायदळ वाहतूक करून कत्तलीसाठी जाणाऱ्या दोन गौवंश आणि मास कापण्याचे साहित्य घेऊन जाणाऱ्या आरोपी साबीर खान वल्द हसन खान वय 28 वर्ष आझाद चौक शिरजगाव कसबा या पकडून त्याच्या ताब्यातून 27130 मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कार्यवाही ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ हरी बालाजी एन,अचलपूर पोलीस उपविभागीय अधिकारी पोपट अबदगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गोपाल उपाध्यय शिरजगाव कसबा ,सहायक फौजदार कांबळे,पोलीस हेड कॉस्टबल संजय वंजारी,हेड कॉस्टबल सुरेश धाकडे,नाईक पोलीस कॉस्टबल सूरज भेले,प्रतापसिग ओलिश्रेती,हेड कॉस्टबल विठ्ठल मुंडे,भुणेशवर तायडे,यांनी केली.

प्रतिक्रिया:-
मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध धंदे वर आमचे लक्ष असून या गंभीर परिस्थिती ची जाणीव अवैध धंदे करणारे यानानाही.त्यामुळे त्यांना अटक करून गुन्हा नोंदविला जात आहे.तसेच पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेले सर्व अवैध धंदे वर आळा घालू.
गोपाल उपाध्यय ठाणेदार
शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन