*पेट्रोलपंपाची वेळ आता सकाळी 8 ते दुपारी 2 – अत्यावश्यक सेवा वाहनांसाठी पंप पूर्णवेळ सुरू*

951

अमरावती –  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात व राज्यात प्रभावी उपाययोजना करण्यासोबतच प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. याचाच भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच विषाणूचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरु नये म्हणून जिल्ह्यातील सर्व शहर व ग्रामीण क्षेत्रातील पेट्रोल पंप सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सामान्य नागरिकांसाठी खुले राहतील, असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.

हे आदेश त्यांना गृह विभाग फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (2) (3) नुसार संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आले असून गृह विभागाच्या आदेशान्वये संचारबंदीचा कालावधी 14 एप्रिल 2020 पर्यंत आहे. सदर आदेशान्वये जीवनावश्यक वस्तू व त्या संबंधित असलेले किरकोळ, घाऊक व अत्यावश्यक सेवा विक्रेता यांच्यासाठी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात आले आहे.

तसेच दुपारी 2 वाजता नंतर केवळ अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवेतील वाहनासाठी तसेच या सेवेतील शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या वाहनाकरीता सदर पेट्रोलपंप पूर्णवेळ सुरु राहतील, असे आदेशात नमूद आहे.

 

 

जाहिरात