अकोट वासी यांकरिता हॅन्ड वॉश स्टेशनची सुविधा

0
1083
Google search engine
Google search engine

आकोटःसंतोष विणके

हात स्वच्छ धुण्यासाठी नगरपालीकेने केली व्यवस्था

जगात सर्वत्र कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या विषाणूंचा संसर्ग जास्तीत जास्त हाता द्वारे होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याकरिता जास्तीत जास्त वेळा हात धुऊन स्वच्छ करण्याचे सतत सांगण्यात येत आहे. भाजी बाजार, किराणा मार्केट, फळ मार्केट, मेडिकल दुकान इत्यादी सार्वजनिक ठिकाणी बरेच जणांना हात स्वच्छ करणे शक्य होत नाही. ही बाब हेरून अकोट पालिकेचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांचे मार्गदर्शनात नगर परिषद अकोट आरोग्य विभागामार्फत सार्वजनिक ठिकाणी तात्पुरते हँडवॉश स्टेशन तयार केले आहे.

हँडवॉश स्टेशन सार्वजनिक ठिकाणी ठेवण्यात येऊन याद्वारे सुद्धा कोरोना विषाणू प्रादुर्भावाला आळा घालण्यात येणार आहे.आज अकोला रोड येथे हे स्टेशन लावण्यात आले आहे तर सोनु चौक,यात्रा चौक,कलदार चौक,मोठे बारगण,न.प.कार्यालय आदी ठीकाणी लावण्यास आरोग्य विभाग कर्मचारी
प्रयत्नरत आहेत

अकोट शहरात हॅन्ड वॉश स्टेशनची संकल्पना राबविण्याकरिता आर्किटेक रवी पवार,आरोग्य विभाग प्रमुख,रोशन कुमरे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी व पर्यावरण,तसेच आरोग्य निरिक्षक चंदन चंडालिया व आरोग्य विभाग कर्मचारीपरीश्रम घेत आहेत.