परळी शहरात एसआरपी प्लाटून दाखल !

0
607

परळी शहरात एसआरपी प्लाटून दाखल !

बीड परळी वैजनाथ: नितीन ढाकणे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह जिल्हाभरात संचारबंदी लागू आहे.संचारबंदी शिथिल कालावधी दरम्यान काही नागरिक सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळत नसून याकरिता पोलीस प्रशासनाच्या मदतीसाठी आता परळीत जालना येथून राज्य राखीव पोलीस बल (एसआरपी) चे प्लाटून 30 कर्मचारी दाखल झाले आहेत बुधवार दि.8 एप्रिल पासून लॉक डाऊन दरम्यान एसआरपी चे 30 कर्मचारी परळी शहरात दाखल झाले आहेत .कोणिही विनाकारण परळी शहरात फिरु नये विनाकारण फिरणाराची गय केली जाणार नाही

लॉक डाऊन दरम्यान परळीत संचारबंदी लागू कारण्यात आलेली आहे.सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या आस्थापणा काही वेळेत सुरू आहेत.या वेळेत नागरिकांनी कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सोशल डिस्टनसिंग पाळणे अनिवार्य आहे.असे असतानाही काही जण हे नियम तोडत आहेत शिवाय विनाकारण रस्त्यावर फिरतांना दिसत आहेत.अशा सर्व बेशिस्त नागरिकांना पोलीस प्रशासन कारवाई करत आहे,आता परळी पोलिसांच्या मदतीला एसआरपी प्लाटून चे तीस कर्मचारी परळी शहारात चौका- चौकात व महत्त्वाचे ठिकाणी असणार आहेत तरी शहरातील सर्व परळी परिसरातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन पोलीस प्रशासना तर्फे करण्यात आले आहे.