कोरोना काळात लहान मुलांच्या मानसिकतेकडे पालकांनी लक्ष द्यावे -: श्री तुषार चव्हान, प्राचार्य, एकविरा स्कूल

0
741
Google search engine
Google search engine

दर्यापूर :-

सर्व पालकांनी आपल्या मुलांकरिता मिनिटामिनिटांचे  वेळापत्रक आखून  ठेवलेले असतील आणि मुलांकडून पालकांनी खुप काही अपेक्षा केल्या असतील तर सध्या असलेल्या खाली वेळातील वेळेत तास अन तास काहीतरी शिकविण्यात घालवावा असे मत एकविरा स्कूल ऑफ ब्रिलीयंट,दर्यापूरचे प्राचार्य तुषार चव्हान यांनी प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकातून व्यक्त केले आहे
पालकांनी त्यांच्या मुलांना ऑनलाइन ऍक्टिव्हिज, विज्ञानाचे प्रयोग विविध पुस्तके व बरेच ऑनलाईन अँप उपलब्ध करुन दिले असतील पण या विविध टेकॅनॉलॉजीचा मर्यादितच उपयोग करायला हवा व मुलांना शक्यतोवर यांपासून थोडे दुर ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा
सद्यस्थितीत आपली मुले आपल्या प्रमाणेच घाबरली आहेत आपली मुले फक्त आजूबाजूला चालत असलेल्या घडामोडी ऐकत असतात नाहीतर ते आपल्यात असलेला ताणतणाव भीती, चिंता याचा अनुभव करीत आहेत याआधी त्यांनी कधीच अश्या काही गोष्टींचा अनुभव घेतला नाही व आपणही असे काही अनुभवले नाही
शाळेला सुटी असणे, घरीच राहणे हे ऐकल्यावर मुलांना खुप बर वाटत व त्यामुळे ते आपल्या डोक्यात उन्हाळ्याच्या सुट्या कशा घालविता येतील तसेच विचार रंगवितात की ज्यामध्ये मैदानात मित्रासोबत खेळणे,बाहेर फिरणे, सायकल चालविणे इत्यादी गोष्टी डोक्यात ठेवत असत पण याउलट ते आता कोरोनामुळे घरातच बंदिस्त आहेत मुलांना त्यांच्या मित्रासोबत खेळणे तर दुरच ते मित्र आज त्यांना दिसतही नाहीत तर दुसरीकडे कुटुंबातील खुप कमी वेळा एकत्र दिसणारे सदस्य आता सर्वांसोबत घरातच दिसुन येत आहेत त्या सर्वासोबत हि मुले आता घरीच राहत असून कुटुंबातील सर्व सदस्यांना एकत्र पाहण्याची हि त्यांची पहिलीच वेळ आहे
या सर्व गोष्टीमुळे दिवस जसेजसे पुढे जातील तसा तुम्हाला तुमच्या मुलांच्या वागणुकीत व स्वभावात बराच बदल दिसून येईल या बदलात चिडचिडेपणा वाढू शकतो किंवा वडीलधारी मंडळींच्या गोष्टीला मुले विरोध करतानाही दिसुन येतील हे सर्व सध्याच्या परिस्थितिला अनुसरून अपेक्षित आहे मात्र यासाठी मुलांना रागाऊ किंवा मारु नये
सध्या सर्वाच्या मुलांना सांत्वनाची व प्रेमाची गरज आहे की त्यांच्यामध्ये सध्या असलेली परिस्थिती लवकरच ठीक होईल अशी भावना मुलांत निर्माण करणे गरजेचे आहे या परिस्थितीत पालकांनी मुलांविषयीचे बनविलेले वेळापत्रक फाडुन टाकावे व मुलांकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन त्यांच्यावर प्रेम करावे असे मत तुषार चव्हान यांनी व्यक्त केले