*सक्करसाथेतील घाऊक बाजार पर्यायी जागांवर :- 18 घाऊक विक्री दुकाने स्थलांतरित*

0
2710
Google search engine
Google search engine

अमरावती : _येथील हाथीपुरा व सक्करसाथ बाजार हे क्षेत्र कंटेटमेंट झोन घोषित केल्याने तेथील घाऊक किराणा बाजार बंद करण्यात आला आहे. तथापि, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहण्याच्या दृष्टीने पर्यायी ठिकाणांवर ही घाऊक विक्रीची दुकाने सुरु राहतील._

येथील हाथीपुरा परिसरात निधन झालेल्या एका व्यक्तीचा व त्यांच्या संपर्कातील इतर तिघांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या परिसराला कंटेटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.  त्यामुळे घाऊक किराणा बाजार अन्यत्र स्थलांतरित करण्यात आला आहे.

_सक्करसाथ येथील गोदामात असलेल्या किराणा मालाचा साठा सात दिवसांच्या आत पर्यायी ठिकाणी पोचविण्यात यावा, त्याचप्रमाणे, सर्व किराणा घाऊक विक्रेता व कर्मचारी यांनी मास्क व हातमोज्याचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ग्राहक व कर्मचा-यात सोशल डिस्टन्स ठेवणे व स्वच्छता राखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत._

त्यानुसार गंगाबकसर बंसीधन ही आस्थापना एमआयडीसी परिसरातील खंडेलवाल इंडस्ट्रीजमध्ये, भिवसरिया इंडस्ट्रिज आणि गोविंद अँड कंपनी या दोन आस्थापना बडनेरा रस्त्यावरील व्यंकटेश ऑईल इंडस्ट्रीज येथे, तर जयप्रकाश किराणा ही आस्थापना रामलक्ष्मण संकुलात स्थलांतरित करण्यात आली आहे.

बद्रीनारायण ओमप्रकाश ही आस्थापना रुक्मिणीनगरात, तर श्रीराम डाळ मिल व चतुर्भुज शिवप्रसाद या दोन आस्थापना बडनेरा नवी वस्तीतील रेस्टहाऊस रोडला सुरू राहतील. शिवसहाय सूरज नारायण खंडेलवाल ही आस्थापना कॅम्प रस्त्यावरील शिवछाया इमारतीत सुरू राहील. ए. टी. फूड प्रॉडक्ट ही आस्थापना अंबिकानगरातील हनुमान मंदिराजवळ सुयोग इमारतीत सुरु राहील.

रतनलाल रमणलाल करवा हे बालाजी प्लॉट येथे, नारायणदास करवा अँड कंपनी हे खापर्डे बगिच्यातील करवा इंटेरियर येथे, तर साबु ट्रेडर्स विलासनगर रस्त्यावरील तिवसा जिन येथे सुरु राहील. पवनसुत ट्रेडिंग कंपनी ही बडनेरा रस्त्यावरील नंदा मार्केटसमोर नवाथे प्लॉट येथे, नेकचंद अँड सन्स ही आस्थापना एम-23, एमआयडीसी येथे, तर भोजवानी ट्रेडर्स रामलक्ष्मण संकुलात सुरू राहील.

पी. विजयकुमार अँड कंपनी हे एफ 34, एमआयडीसी येथे, तर कमलकिशोर लक्ष्मीनारायण हे बडनेरा नवी वस्तीतील शनिमंदिराजवळ व रश्मी ट्रेडर्स हे न्यू कॉटन मार्केट रस्त्यावर सुरू राहील. या सर्व ठिकाणी स्वच्छता राखणे बंधनकारक असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत.