शेगाव न. प. मध्ये लागली जिल्ह्यातील पहिली स्वयंचलित सॅनिटायजर स्प्रे मशीन

0
1206
Google search engine
Google search engine

शेगाव न. प. मध्ये लागली जिल्ह्यातील पहिली स्वयंचलित सॅनिटायजर स्प्रे मशीन

शेगांव :- जसे जसे दिवस वाढत आहेत तसे तसे कोरोना व त्यासंबंधी सरकारची व प्रशासनाची जबाबदारी वाढतच जात आहे. सर्वत्र लॉक डाऊन असताना जे प्रशासकीय कर्मचारी, डॉक्टर, सफाईकामगार आपला जीव बंद मुठीत घेऊन समाज कल्याणासाठी आपल्या घरा बाहेर पडत आहेत त्यांच्या प्रती व समाजातील घटका प्रती प्रशासन मोठ्या तेजीने आपली सक्कल लढवत आहे, अशी शक्कल शेगांव नगरपरिषदेने लढवून शहरातील इंजिनियर युवा वर्गाला सोबत घेऊन लढवली आहे ते म्हणजे स्वयंचलित सॅनिटायजर स्प्रे मशीन.
या मशिनीचे निर्माण एम्बाॅक्स टेक्नॉलॉजिकल सोल्युशन कंपनीचे इंजिनियर प्रसाद देशमुख, सुहास जायभाय यांनी केले असून ही सध्या शेगाव न. प. कार्यालयातील परिसरात लावण्यात आली आहे
या स्प्रे मशिनीची खासियत अशी की त्या मशिनीमध्ये गेल्यावर अवघे ८ सेकंद सॅनिटायजरचा स्प्रे अंगावर होतो व मनुष्य सॅनिस्ट्राइज होऊन बाहेर येतो ही स्प्रे मशीन पूर्ण ऑटोमॅटिक असून ती आज पासून जनतेच्या सेवेत रुजू झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातिल शेगावच्या युवकांनी ऑटोमेटीक सेनेट्राईज मशीन बनवुन ही मशिन न प ला दिली आणी ईतरही सार्वजनिक जागांनवर ही मशीन लावण्यात येणार आहे असे मत नगराध्यक्ष शकुंतला बाई बुच व आरोग्य सभापती ज्योतिताई चांडक यांनी आमच्या प्रतिनिधि शी बोलतांना सांगीतले शिवाय ज्या युवकांनी हे उपकरण बनवले त्यांचे अशा संकट काळी सुद्धा ही युवा पिढी समोर येऊन उपक्रम करीत आहे असे म्हणत अभिनंदन मुख्याधिकारी शेळके यांनी केले. तसेच नगरसेवक पवन महाराज शर्मा यांनी या युवकांना लॉक डाऊन च्या काळात सहकार्य केले .