शिरजगाव कसबा येथे भरला आठवडी बाजार,स्थानिक प्रशासन बाबत प्रश्नचिन्ह तर कार्यवाही कोणावर होणार ? लोकांना कोरोना चे गांभीर्य नाही.

0
1696
Google search engine
Google search engine

शिरजगाव कसबा येथे भरला आठवडी बाजार,स्थानिक प्रशासन बाबत प्रश्नचिन्ह तर
कार्यवाही कोणावर होणार ? लोकांना कोरोना चे गभीर्या नाही.

चांदुर बाजार:-

अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा या ठिकाणी आठवडी बाजार भरण्यात आला असल्याने कोरोना सारख्या गंभीर परिस्थिती मध्ये लोक गंभीर नसल्याने त्यांना कोरोना ची भिती नसल्याचे स्पस्ट होते.तर जीवनावश्यक वस्तू मध्ये येत असल्याने भाजीपाला चे दुकान लावण्यात आले.मात्र स्थानिक ग्रामपंचायत आणि महसूल प्रसासण या बाबत सतर्क नसल्याचे दिसत आहे.

भाजीपाला दुकान लावताना सोशल डिस्टिंग बाबत ग्रामपंचायत ने 1 मीटर अंतररावर रिंग करायला पाहिजे होते.तसेच लोकांनी गर्दी करू नये यासाठी ग्रामपंचायत स्तरावर स्थापन केलेल्या समिती यांची यांची जबाबदारी होती की त्यांनी नागरिकांना एका ठिकाणी जमा होऊ नये याची खबरदारी घ्यावी मात्र प्रशासन यांनी याबाबत अनभिज्ञ असल्याचे सोग घेतले असल्याचे दिसून आले.एका ठिकाणी एका पेक्षा अधिक लोक जमा होणार नाही यासाठी आठवडी बाजार लक्षात घेता दवंडी देणे आवश्यक होते मात्र याकडे स्थानिक प्रशासन यांनी लक्ष दिले नाही.

तर गावातील गुजरी या ठिकाणी भाजीपाला ची विक्री नेहमी 8 ते 12 या वेळेत होत होती.मात्र गर्दी पाहता ग्रामपंचायत ने गर्दी होऊ नये म्हणून त्यांना आठवडी बाजार येथे भाजीपाला विक्री साठी वट्यावर जागा देण्यात आली आहे.मात्र नागरिक गंभीर नसल्याचे शिरजगाव कसबा या ठिकाणी दिसून येत आहे.

प्रतिक्रिया
#गुजरी येथे भाजीपाला विक्री करणारे याना आठवडी बाजार मधील वट्यावर भाजीपाला विक्री साठी 15 ते 20 लोकांना नोटीस देऊन परवानगी दिली या ठिकाणी नागरिक गांभीर्य समजून सोशल डिस्टिंग पाळायला पाहिजे होते.लोक जर गंभीर नसेल तर कार्यवाही करणयात येईल तसेच शक्य झाल्यास भाजीपाला विक्री करणारे यांच्यावर निर्बंध लावण्याचा विचार करू.


1)नंदलाल पतालिया ग्रामविकास अधिकारी शिरजगाव कसबा

# भाजीपाला हा विक्री साठी दुकान लावण्यात आले होते.मात्र नागरिक गंभीर नसेल तर त्यांच्या कार्यवाही करणयात येतील.तसेच विनाकारण फिरणाऱ्या अनेकांना वर कार्यवाही करणयात आली आहे.लोकांनी सहकार्य करावे अन्यथा दोषींवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.


2)गोपाल उपाध्यय ठाणेदार शिरजगाव कसबा.