मोर्शी वरुड तालुक्यातील कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची आमदार देवेंद्र भुयार यांची मागणी !

0
773

 

मोर्शी तालुका प्रतिनिधी /
मोर्शी वरुड तालुक्‍यात शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने कापुस विकावा लागत आहे. शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या हमीभावाचा फायदा होवून त्यांच्या मालास चांगला भाव मिळेल. यासाठी सी.सी.आयचे कापुस खरेदी केंद्र त्वरित सुरु करण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे . मोर्शी वरुड तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतल्या जाते. परंतु सद्या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर संपूर्णतः संचार बंदी लावण्यात आली असल्यामुळे कापूस खरेदी केंद्रे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे मोठ्याप्रमाणात सर्व शेतकऱ्याच्या घरी कापूस पडून आहे. परंतु आता उन्हाळ्याचे दिवस अराल्यागुळे शेतकयांनी घरात साठवूण ठेवलेल्या कापसाला आग लागून नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वरुड मोर्शी तालुक्यातील शासकीय कापूस खरेदी केंद्रे तातडीणी सुरु करणे अत्यंत गरजेचे आहे. करीता कलम १४४ अंतर्गत लावण्यात आलेल्या संचारबंदीतून वरुड, मोर्शी तालुक्यातील कापूस खरेदी केंद्रांना सुंट देण्यात यावी, संचारबदीचे अधिन राहून कापूस खरेदी केदें सुरु करण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे .
कमी अधिक पावसामुळे कापसाचे पुर्णपणे नुकसान झाले आहे. सतत पावसाळा सुरू राहिल्यामुळे पेरणी उशिरा झाली त्यामुळे कुठे कुठे थोडा कापूस निघतो आहे. खासगी व्यापाऱ्यांनी कापुस खरेदी केंद्र सुरु केली आहेत. शेतकऱ्यांना पैशाची गरज असल्याने त्या कापसाची आवक होत आहे. मात्र त्याला मिळणारा भाव हा हमीभावापेक्षा खुप कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होवून ते सर्व बाजूने संकटात सापडले आहेत. सी.सी.आयचे कापुस खेरदी केंद्र सुरु झाल्यास शासनाने जाहीर केलेल्या हमी भावाचा फायदा शेतकऱ्यांना होईल. त्यांच्या मालास चांगला भाव मिळेल व बाजारपेठेत भाव टिकुन राहतील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने लवकरात लवकर केंद्र सुरु करावे.अशी मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी केली आहे . आमदार देवेंद्र भुयार कायम शेतकरी हिताच्या दृष्टीने प्रयत्न करीत असल्याचे चित्र दिसत आहे .