संत्रा व्यावसायिकांची मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये १ लक्ष रुपयांची मदत – आमदार देवेंद्र भुयार यांच्या मार्फत  मदतनिधी जमा ! 

475

संत्रा व्यावसायिकांनी दिला मदतीचा हात . 

वरुड /  तालुका प्रतिनिधी :
वरुड तालुक्यातील संत्रा व्यावसायीक, संत्रा मार्केट व्यापारी बांधवांकडू  मुख्यमंत्री सहायता निधी कोविड १९ करीता शासनास मदत निधी देऊन मदतीसाठी पुढाकार घेऊन वारस तालुक्यातील  संत्रा व्यापारी, संत्रा मार्केट वरुड यांनी १ लक्ष रु आमदार देवेंदें भुयार यांच्या मार्फत मदतनिधीचा धनादेश देऊन पाठविण्यात आला . वीदर्भातील कॅलिफोर्निया म्हणून
नागपूरी संत्रा उत्पादनाकरिता प्रसिध्द असलेल्या वरुड तालुक्याची संपूर्ण अर्थव्यवस्था संत्रा व्यापारावर अवलंबून आहे. प्रामुख्याने संत्रा व्यापारत येथील सामान्य मजूर वर्गापासून ते शेतकरी, व्यापारी, घाऊक
व्यापारी ते थेट देशात व विदेशात वरुड तालुक्याचे महत्वपूर्ण योगदान राहले आहे. वेळांबेळी नेसर्गिक आपत्ती मध्ये देश सापडला असता संपूर्ण तालुक्यातील सर्वमान्यवर्ग मदतीस धावून येते. सद्या देशात कोरोना १९ या रोगाने थेमान घातले असल्याने देश प्रचंड अडचणीत सापडलेला आहे. महाराष्ट्र शासन खबरदारी महणून सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे. राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांनी कोराना -१९ वर मात करण्याकरीता मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये मदत निधी देण्याचे आवाहन केले आहे. त्या अनुगंगाने संत्रा व्यावसायीकांतर्फे कोरोना वर मात करण्याकरीता सामाजीक बांधिलकी जोपासत एक हात मदतीचा म्हणून मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये मदतनिधी वरुड तालुक्यातील संत्रा व्यापऱ्यांकडून १ लक्ष रुपये मदतनिधी आमदार देवेंद्र भुयार यांना धनादेश देऊन त्यांच्या मार्फत जमा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री सहायता मदत निधीमध्ये वरुड तालुक्यातील संत्रा व्यापारी शेख अलीम  , सैय्यद मजहर सैय्यद नाईम , निलेश मगरदे,  सुरेंद्र घारड , समीर जमशेद खा , नासिर खान , बाबाराव इंगळे , प्रफुल निवल , सैय्यद बुरहान , अनिल उपासे , चंद्रशेखर बहुरूपी , जाबिर खान , गफार खान , सुरेश श्रीराव , आबीद बेग , हाजी मुस्ताक , अन्सार खा साहेब खा , शेख जाकीर शेख अहमद , नत्थुजी सीनकर , रफिक खान , शेख महफुज शेख ताज , जुबेर अहमद अब्दुल मतीम , रियाझ खान , असद खान , शफी उल्ला खा , तोषिफ खान , सण्णा उल्ला खा , फाजील ओदिन काझी , आसिफ खान , सरदार खा काले खा , मधुसूदन दुपारे , मनोहर जावळे , सलीम भाई , साहेबराव झटबडे , शेख रकिम , खुद्दुस खा , सैय्यद सादिक , रवी आगरकर या संपूर्ण संत्रा व्यावसायिक संत्रा मार्केट वरुड यांनी मुख्यमंत्री सहायता निधी कोविड १९ करिता १ लक्ष रुपये मदतनिधी आमदार देवेंद्र भुयार यांच्या मार्फत शासनास मदत म्हणून जमा करून राज्य संकटात असतांना मदतीचा हात पुढे केला आहे .

जाहिरात